कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल : राजेश टोपे
कोरोनाचा उद्रेक सुरूच; एका दिवसात ४३ हजार १८३ नवे रुग्ण
मुंबई : महाराष्ट्रात गुरुवारी एका दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. कोरोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पहिल्या क्रमांकावर सातत्य राखलं आहे. महाराष्ट्रात देशभरातील सर्वाधिक 65 लाखांहून नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून गुरुवारी एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने उच्चांक गाठला. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. यानुसार काल पहिल्यांदाच 3295 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून तब्बल 3 लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. यामुळे राज्यात गुरुवारी रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे या लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 57 हजार जणांना कोरोना लस देण्यात आली. त्यापाठोपाठ मुंबईत देखील 50 हजार जणांचे लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पहिल्या क्रमांकावर सातत्य राखलं आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर आहे.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यानुसार सध्या दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाचा उद्रेक सुरूच; एका दिवसात ४३ हजार १८३ नवे रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. बुधवारी हा आकडा ३९ हजार ५४४ इतका होता. त्यामुळे एका दिवसात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जवळपास चार हजारांनी वाढला. तसेच मागील २४ तासांत ३२ हजार ६४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत राज्यात एकूण २४,३३,३६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.२० टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.