Top Newsराजकारण

शेवटच्या क्षणी मोदींचा धक्का; जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनाही ‘डच्चू’

महाराष्ट्रातील २ मंत्र्यांसह मोदी सरकारमधील १२ मंत्र्यांचा राजीनामा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल करण्याचा क्षण अगदी जवळ आला असतानाच दीर्घकाळापासून मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेक दिग्गज नेत्यांना नारळ देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर शेवटच्या क्षणी कायदे आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचाही राजीनामा घेण्यात आला.

शपथविधी कार्यक्रमापूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळातील तब्बल १२ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. यामध्ये डी. व्ही. सदानंद गौडा, रविशंकर प्रसाद, थावरचंद गहलोत, रमोश पोखरियाल निशंक, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, संतोष गंगवार, बाबुल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया, प्रतापचंद्र सारंगी, देबश्री चौधरी यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button