Top Newsराजकारण

देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या मोदी सरकारचा दरोडा : पी. चिदंबरम

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून कोरोना परिस्थिती, लसीकरण, इंधनदरवाढ, बेरोजगारी, महागाई यांसारख्या अनेकविध मुद्द्यांवरून काँग्रेस सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. यातच आता मोदी सरकाच्या नव्या राष्ट्रीय चलनीकरण धोरणावर टीका करत, मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालत असल्याचा घणाघात केला आहे.

राष्ट्रीय चलनीकरण धोरण यावर संसदेत कोणतीही चर्चा केली नाही. उलट संसदेचे अधिवेशन संपल्यावर हे धोरण जाहीर केलं. या धोरणाअतंर्गत मोठी पायाभूत सुविधांची कामे पुढील काही वर्षात केली जाणार असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र, हे अशक्य आहे. या धोरणाच्या उद्देशाबाबत मोदी सरकारने स्पष्टीकरण द्यावे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रीय चलनीकरण धोरणाची उद्दिष्ट्ये काय आहेत, या माध्यमातून ४ वर्षांत केवळ ६ लाख कोटींचा महसूल मिळवण्याचे लक्ष्य आहे का, यातील मालमत्ता, कंपन्या, प्रकल्प निवडताना नेमकी कोणती वर्गवारी निश्चित करण्यात आली होती, असे सुमारे २० प्रश्न पी. चिदंबरम यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत चर्चा करत नाहीत. विरोधकांना सामोरं जात नाहीत. देशाचे नेतृत्व करत असताना पत्रकार परिषदेला सामोरे न जाणारे नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत, अशी टीका चिदंबरम यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button