राजकारण

…तर आम्हालाही झिंगाट दाखवावा लागेल; मनसेचा अदानी समुहाला इशारा

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी समुहाकडे देण्यात आला आहे. हा ताबा मिळताच अदानी उद्योग समुहाने आपले मुंबईतील मुख्यालय हे गुजरातला हलवले आहे. त्यातच सोशल मीडियात सुद्धा एक व्हीडिओ व्हायरल होत होता. या संपूर्ण प्रकरणात आता मनसेने उडी घेत अदानी समुहाला इशारा दिला आहे.

मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे देण्यात आले आहे. व्यवस्थापनाचा एकूण ७४ टक्के हिस्सा आदा अदानी समुहाकडे आला आहे. हा निर्णय झाल्यानंतर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अदानी समूहाचे काही कर्मचारी गरबा करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेने या प्रकरणात उडी घेतली आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट करत इशाराच दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, “फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलंय… विमानतळ मुंबईमध्येच आहे…. आम्हाला डीवचण्यासाठी गरबा कराल तर आम्हालाही आमचा झिंगाट दाखवावा लागेल.” मुंबई विमानतळावरून जीव्हीकेचे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचेही असो, पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आवाज हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या असंही ट्विट नितीन सरदेसाई यांनी केलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button