अर्थ-उद्योग

मायक्रोसॉफ्टकडून एसएमबींना यशासाठी डिजिटल कौशल्ये विकसित करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन

नवी दिल्ली : लघु आणि मध्यम उद्योगांना (एसएमबी) योग्य त्या डिजिटल कौशल्यांसह सर्वांच्या पुढे राहण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने मायक्रोसॉफ्ट इंडियाने आज आपले सर्व संबंधित कौशल्य विकास स्त्रोत एकत्रित करून कौशल्य उपक्रमाला सुरूवात केली. देशातील एसएमबींसाठी विशेषतः तयार केलेल्या या प्रयत्नातून जागतिक साथीदरम्यान जवळपास तीन दशलक्ष भारतीयांना उपयुक्त ठरलेली डिजिटल कौशल्ये साध्य करण्यासाठी जागतिक कौशल्य उपक्रमांवर भर दिला जातो.

लघु आणि मध्यम उद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. ते भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे ३० टक्क्यांची भर घालतात आणि सुमारे ११४ दशलक्ष लोकांना रोजगार देतात. एसएमबींना बाजारातील बदलांना प्रतिसाद देण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने, त्यांच्या संघटना सुयोग्य बनवणे, धोक्यांपासून संरक्षित करणे आणि दीर्घकालीन व्यावसायिक टिकाऊपणासाठी नियोजन करणे यांच्यासाठी डिजिटल कौशल्ये अत्यावश्यक आहेत. तथापि, कर्मचारी कौशल्यांचा अभाव हे जागतिक साथीला प्रतिसाद देण्यातील एसएमबींसमोर असलेल्या मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. डिजिटल साक्षरतेसाठी ग्राहकांच्या मोठ्या अपेक्षा, आणि जोडलेल्या डिजिटल अनुभवांत वाढ यांच्यासह एसएमबींना कार्यक्षमता आणि तग धरण्याची क्षमता यांच्याद्वारे अधिक ग्राहक सहभागासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सातत्याने नवनवीन पद्धती शिकण्याची गरज आहे.

व्यवसाय जास्तीत-जास्त तंत्रज्ञानावर अवलंबून राहू लागल्याने डिजिटल कौशल्ये एसएमबींना योग्य त्या डिजिटल साधनांचे मूल्यमापन आणि अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्यासाठी मदत करतात. आपली डिजिटल कौशल्ये विकसित करून एसएमबी संघटनात्मक प्रक्रियांसह तसेच कर्मचारी बुद्धिमत्तेसह आपल्या ज्ञानाचे भांडवल वाढवतात आणि त्यांना डिजिटलदृष्ट्या सुयोग्य अर्थव्यवस्थेत अधिक स्पर्धात्मक फायदा देतात.

मायक्रोसॉफ्ट इंडियाचे लघु, मध्यम आणि कॉर्पोरेट व्यवसायाचे राष्ट्रीय प्रमुख हरीश वेल्लट म्हणाले की, ”एसएमबी हे जागतिक साथीनंतर देशातील आर्थिक पुनर्बांधणीसाठी आघाडीवर आहेत आणि त्यांना आपण कसे काम करतो आणि जगतो यातील नाट्यमय बदलांसोबत जुळवून घेण्यासाठी मोठ्या ताणतणावांचा सामना करावा लागत आहे. आपल्या व्यवसायासाठी दीर्घकालीन धोरणे विकसित करण्यासाठी कौशल्यांनी सुसज्ज करणे आणि त्यांच्या यशासाठी नवीन मार्गांची नव्याने संकल्पना करणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. हे कौशल्य उभारणी स्त्रोत देऊन आम्ही सर्वसमावेशक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची आणि एसएमबींना आमूलाग्र बदल घडवून आणून टिकून राहण्यासाठी आमची वचनबद्धता पूर्ण करत आहोत.”

लहान उद्योग मालकांना आपल्या व्यवसायातील वाढीवर भर द्यायचा आहे – योग्य प्रशिक्षण माध्यमे शोधण्यावर नाही. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे उद्दिष्ट त्यांना कशाची आणि कधी गरज आहे हे शोधणे सोपे करण्याचे आहे. लवचिक आणि सहजसाध्य कौशल्य उभारणी दृष्टीकोनातून मायक्रोसॉफ्ट लर्न आणि लिंक्डइन लर्निंग यांच्यासारख्या स्त्रोतांमधून ई-लर्निंग आणि ऑनलाइन प्रशशि७ण घटकांद्वारे डिजिटल कौशल्य स्त्रोत दिले जातात. रिसोर्स हबच्या (resource hub) माध्यमातून बिझनेस सिद्ध केलेले ज्ञान, तांत्रिक प्रशिक्षण, ऑनलाइन वर्कशॉप्स आणि सर्वोत्तम पद्धती अवगत करू शकतात आणि मायक्रोसॉफ्टची तांत्रिक प्रशिक्षण मार्गांची प्रमाणपत्रे मिळवू शकतात. एसएमबीच्या सर्वोच्च प्राधान्यांना स्त्रोतांशी जोडणे म्हणजे ते आपल्या संस्थेसाठी सर्वाधिक महत्त्वाचे काय आहे त्यावर लक्ष्याधारित कौशल्ये विकसित करू शकतात.

ग्राहकांशी जोडून व्यवसाय वाढवणे. ग्राहक नातेसंबंध व्यवस्थापनासाठी (सीआरएम) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी योग्य डिजिटल कौशल्ये, डिजिटल मार्केटिंग, जाहिरात आणि ब्रँडिंग यांच्यामधून व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांना चांगली सेवा देणे आणि नवनवीन लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.
कर्मचाऱ्यांना सहभागी आणि उत्पादक ठेवणे. एखाद्या व्यवसायात एकच कर्मचारी असेल किंवा मोठी टीम असली तरी डिजिटल कौशल्ये लोकांना सहभागी राहून अर्थपूर्ण प्रकल्प चालवत असताना लक्ष्याधारित राहण्यासाठी मदत करतात.

वेळ आणि स्त्रोतांच्या बचतीसाठी अधिक कार्यक्षमता साध्य करणे. तंत्रज्ञानामुळे व्यवसायांना ग्राहकांच्या गरजा तात्काळ पूर्ण करणे आणि मॅन्युअल प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडणे शक्य होते. त्यामुळे व्यवसायांनी त्यांच्या विभागांना जोडलेले ठेवण्यासाठी, ओव्हरहेड खर्च कमी करून कार्यक्षमता वाढवण्यासाठी साधनांचा वापर कसा करावा हे शिकले पाहिजे.

डिजिटल जगात सुरक्षितता वाढवणे. कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम पद्धतींद्वारे शिक्षित करून आणि कौशल्ये देऊन व्यवसायांना ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य होते. उल्लंघने टाळून हे व्यवसाय संबंधित मोठे खर्च आणि प्रतिष्ठेचे होणारे नुकसान टाळू शकतात.

बाजारातील संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. व्यवसाय डिजिटलदृष्ट्या अधिक सक्षम आणि कौशल्याधारित होत असल्याने ते उपलब्ध माहिती पाहू शकतात, ट्रेंड्स समजून घेऊ शकतात आणि बाजारातील संधी प्राप्त करण्यासाठी वेगवान हालचाली करू शकतात.

उद्योजकतेतील धड्यांसह विकास. वित्त, मार्केटिंग, बूटस्ट्रॅपिंग, विक्री यांच्यातील मुलभूत तत्त्वे शिकून एसएमबी मालकांना यशस्वी व्यावसायिक कार्यान्वयनासाठी एक चांगली सुरूवात मिळू शकते.

डिजिटल कौशल्यांमुळे व्यवसायांना सुसंगत राहण्यासाठी, नावीन्यपूर्णतेसाठी, टिकून राहण्यासाठी तसेच अधिक सर्वसमावेशक भविष्याधारित बाजारपेठेसाठी सज्ज राहणे शक्य होते. मायक्रोसॉफ्ट देशातील एसएमबींना नफादायी भविष्यासाठी आपली लक्ष्ये कशी साध्य करावीत याची पुनर्कल्पना करण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने वचनबद्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button