मायक्रोसॉफ्ट इंडियाकडून क्लाऊड चॅम्पियन्स ११ प्रोग्रामच्या दुस-या पर्वामधील विजेते जाहीर
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट इंडियाने आज अद्वितीय एंगेजमेंट प्रोग्राम क्लाऊड चॅम्पियन्स ११ च्या दुस-या पर्वामधील विजेत्यांची घोषणा केली. हा एंगेजमेंट प्रोग्राम भारतातील सहयोगींप्रती मायक्रोसॉफ्टच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो. मायक्रोसॉफ्टने सप्टेंबर व डिसेंबर २०२१ पर्यंत एसएमबी ग्राहकांसाठी क्लाऊड विकासाला चालना देणा-या ११ क्लाऊड सोल्यूशन प्रोव्हायडर्सना (सीएसपी) सन्मानित केले. प्रोग्रामने ग्राहक पाठिंबा, किंमत व बिलिंग सुविधा देण्यासाठी मायक्रोसॉफ्टसोबत प्रत्यक्ष संबंध असलेल्या दोन इनडायरेक्ट प्रोव्हायडर्सना (अप्रत्यक्ष प्रदाते) देखील सन्मानित केले. या प्रोग्राममध्ये भारतातील ७१ शहरांमधील जवळपास ७०० सहयोगी संस्थांना सहभाग दिसण्यात आला, यापैकी निम्मा सहभाग द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधून होता. ही पोहोच व समावेशनामधून विकास व सहभागाच्या समान ध्येयामधून प्रेरित मायक्रोसॉफ्टमध्ये सामील झालेला समुदाय दिसून येतो.
देशातील सर्व मायक्रोसॉफ्ट सीएसपी सहयोगींसाठी खुला असलेल्या प्रोग्रामने मायक्रोसॉफ्ट अझुरे, मॉडर्न वर्क, सिक्युरिटी व बिझनेस अॅप्लीकेशन्समध्ये सहभागींनी केलेल्या क्लाऊड बिझनेस विकासानुसार त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. प्रोग्रामने सहयोगी संस्थांना प्रशिक्षण, मास्टरक्लासेस, पीअर लर्निंग, धमाल सहभागात्मक सत्रे, विक्री प्रशिक्षण आणि विक्री टीम्ससाठी रिवॉर्डस् व मान्यता अशा विविध स्तरांवर सामावून घेतले. सहयोगी उपक्रमाच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्टने त्यांच्या सहयोगींसोबत सहयोग केला आणि प्रोग्राम सहभाग सुधारण्यासाठी त्यांच्या अभिप्रायाचा नियमितपणे समावेश केला.
विजेत्यांची यादी:
मॉर्डन वर्क व सिक्युरिटी
गट अ: ५० हजार डॉलर्स व त्यापेक्षा अधिक : सॉफ्टलाइन इंटरनॅशनल, मुंबई
गट ब: १० हजार डॉलर्स ते ५० हजार डॉलर्स : आयबीएन टेक्नोलॉजीज लि., पुणे; झेन्शिया : डोंबिवली
गट क: १ हजार डॉलर्स ते १० हजार डॉलर्स : अॅड्रॉईट इन्फोवेज, चंदिगड; युनिव्हर्सल बिझनेस सिस्टिम्स, नागपूर
इनडायरेक्ट प्रोव्हायडर्स : कम्प्युएज इन्फोकॉम लि., मुंबई
अझुरे
गट अ: ३ हजार डॉलर्स व त्यापेक्षा अधिक : टूकुमुलस टेक्नोलॉजी सोल्यूशन्स एलएलपी, चेन्नई
गट ब: १ हजार डॉलर्स ते ३ हजार डॉलर्स : प्रेमवेअर सर्विसेस इंडिया एलएलपी, सुरत; अॅरोसॉफ्ट सोल्यूशन्स : मुंबई
गट क: ०.५ हजार डॉलर्स ते १ हजार डॉलर्स : क्वेस्टा सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रा. लि., मुंबई
इनडायरेक्ट प्रोव्हायडर्स : टेकडेटा, मुंबई
बिझनेस अॅप्लीकेशन्स : नवीन सहयोगी – अॅक्सिकॉम कन्सल्टींग प्रा. लि., नवी दिल्ली; पॉझिटिव्ह एज टेक्नोलॉजी प्रा. लि., बेंगळुरू
मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या स्मॉल, मेडियम अॅण्ड कॉर्पोरेट बिझनेस विभागाचे कंट्री हेड हरीश वेल्लट म्हणाले, ”क्लाऊड चॅम्पियन्स ११ प्रोग्रामच्या दुस-या पर्वासह आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक संधी देण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी संलग्न असलेल्या आणि नवोन्मेष्कारी क्लाउड सोल्यूशन्स देणा-या सहयोगींच्या नवीन समूहाला सन्मानित करतो. या सहयोगींनी आम्हाला भारतातील एसएमबी परिसंस्थेला त्यांच्या डिजिटल परिवर्तन प्रवासामध्ये मदत करण्यास प्रचंड पाठिंबा दिला आहे.”
पुरस्कार विजेत्यांना बिझनेस कोच मिताली चोप्रा यांच्याकडून व्यावसायिक मार्गदर्शन आणि स्वादिष्ट पाककला अनुभव मिळणार आहे. विजेत्या संस्थांमधील विक्री टीम्सना मायक्रोसॉफ्टकडून विक्री प्रशिक्षण व प्रमाणन मिळेल. या प्रोग्रामअंर्तत देण्यात आलेल्या व्यवसाय प्रशिक्षणाच्या मदतीने गेल्या वर्षाच्या विजेत्यांनी विकास करण्यासोबत व्यवसाय संधींना व्यापून घेतले आहे.