मर्सिडीझ-बेंझची नवी ई-क्लास बाजारपेठेत दाखल
भारतातील लिमोजिन पोर्टफोलिओ अधिक मजबूत
पुणे : भारतातील आघाडीची लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीझ-बेंझ इंडियाने नवी ई-क्लास सादर करत लक्झरी सलोन श्रेणीमध्ये आपले स्थान अधिक जास्त मजबूत केले आहे. ही देशातील सर्वात जास्त पसंत केली जाणारी लक्झरी सेडान आहे. बाहेरील स्टायलिंग आणि डिझाईनमधील विस्तृत बदल, इंटेरियरमधील लक्षणीय वैशिष्ट्यांचा समावेश आणि आधुनिक एनटीजी ६ टेलिमॅटिक्स, उद्योगक्षेत्रातील मापदंड बनलेले एमबीयूएक्स या सर्व पूर्णपणे नवीन आणि शानदार वैशिष्ट्यांसह आजवरची सर्वात गतिशील, रोमांचक, इंटेलिजंट नवी ई-क्लास बाजारपेठेत पदार्पण करत आहे. या श्रेणीतील सर्वात मोठी रियर केबिन ई-क्लासचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, लांब व्हीलबेसमुळे हे शक्य झाले आहे. ड्रायव्हिंगचा रोमांचक अनुभव मिळवून देणाऱ्या सुविधा, आधुनिक सुधारणा या सलोनला तिच्या श्रेणीतील अतुलनीय कार बनवतात.
मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ मार्टिन श्वेन्क आणि मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे सेल्स व मार्केटिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. संतोष अय्यर यांनी नवी दिल्लीत टी अँड टी मोटर्समध्ये नवी ई-क्लास लॉन्च केली. मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी यावेळी सांगितले, “आमच्या ग्राहकांच्या इच्छा, महत्त्वाकांक्षा समजून घेणे, त्यानुसार नवनवीन उत्पादने सादर करणे आणि त्यामध्ये सातत्याने नवेपणा, सुधारणा आणत राहणे हा आमच्या ग्राहकनीतीचा प्रमुख भाग आहे. आधीच्या मॉडेलला मिळालेले यश आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होते आणि ग्राहकांमध्ये आमच्या नव्या मॉडेलविषयी उत्सुकता व अपेक्षा खूप वाढल्या असल्याने आम्हाला नवी ई-क्लास लवकर लॉन्च करावी लागली. नवी ई-क्लास पूर्णपणे नवी आहे, जास्त गतिशील आणि प्रभावी आहे, ही कार ड्राइव्ह करणे अधिक जास्त रोमांचक आहे आणि याच्या वैशिष्ट्यांमध्ये आधीपेक्षा जास्त तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आम्हाला पक्की खात्री आहे की आमच्या संतुलित व्हेरियंत धोरणासह नवी ई-क्लास फक्त शोफर-ड्रिव्हन लक्झरी ग्राहकांनाच नव्हे तर स्पोर्टी कार ड्राइव्ह करायला आवडणाऱ्या ग्राहकांना देखील खूप आवडेल, यामध्ये त्यांना लक्झरी वैशिष्ट्यांमध्ये जराही तडजोड करावी लागणार नाही.”
श्वेन्क यांनी पुढे सांगितले, “आम्ही यावर्षी १५ नवी उत्पादने घेऊन येणार आहोत आणि नव्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज नवी ई-क्लास आमच्या प्रभावी उत्पादन नियोजनाचा शुभारंभ आहे. यावर्षी आम्ही सेडान श्रेणीवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आम्हाला पक्की खात्री आहे की, ई-क्लास ही भारतातील सर्वाधिक यशस्वी लक्झरी सेडान म्हणून कायमच नावाजली जाईल.”
नव्या ई-क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नवे तंत्रज्ञान:
भारतासाठी खास बनवल्या गेलेल्या लांब व्हीलबेससोबत ई-क्लासमध्ये मिळते या श्रेणीतील सर्वात चांगली लेगरूम आणि रिक्लायनिंग सीट्ससोबत सर्वात आरामदायी रियर सीटिंग. नवी ई-क्लास आपल्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह भारतात एक्झिक्युटिव्ह लक्झरी लिमोजिन श्रेणीमधील मापदंड अधिक उंचावते.
मापे: श्रेणीतील सर्वोत्तम लांबी > ५ मीटर्स (५०७५ एमएम). श्रेणीतील सर्वोत्तम व्हीलबेस > ३ मीटर्स (३०७९ एमएम)
बाहेरील डिझाईन: एव्हेंट-गार्डे एक्स्टीरियर पॅकेज. संपूर्णतः नवीन एलईडी हाय परफॉर्मन्स हेडलॅम्प्स. नवे स्प्लिट टेल लाईट डिझाईन आणि नवीन बंपर्ससोबत नव्याने डिझाईन करण्यात आलेले रियर. मर्सिडीझ-मेबॅचने प्रभावित क्वार्टर ग्लास
कारच्या आत नवी वैशिष्ट्ये, आराम व सुविधा:
पुढे आणि पाठी शानदार ओपन पोर वूड ट्रीम्स, अर्टिको लेदर डॅशबोर्ड; स्टीयरिंग व्हीलवर नव्या क्षमतांसह टच कंट्रोल्स; स्मार्ट फोन इंटीग्रेशन पॅकेज; श्रेणीतील सर्वोत्तम रियर रिक्लायनिंग सीट्स आणि सोबत मेमरी फंक्शन (३७ डिग्री); शोफर पॅकेज; सेंटर आर्मरेस्टवर सर्व सुविधांच्या कंट्रोल्ससहित रियर रिमूव्हेबल टचपॅड; ५९० वॅट आउटपुटसोबत बर्मएस्टर सराउंड साऊंड सिस्टिम; पॅनारॉमिक सनरूफ; पाठी वायरलेस चार्जर; स्टोरेजसोबत नव्याने डिझाईन करण्यात आलेले एसी कन्सोल; दरवाजांसाठी पॉवर क्लोज फंक्शन; पार्क पायलट (एक्टिव्ह पार्क असिस्टंस), सोबत रिव्हर्स कॅमेरा; खराब रस्त्यांसाठी सस्पेन्शन.