राजकारण

उत्तर प्रदेशमध्ये कोरोना मृत्यूच्या नावाखाली मोठे हत्याकांड : चंद्रशेखर आजाद

पुणे : उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात लाखो लोकांचे जीव गेले. सरकारने ठरविले असते तर त्यांचा जीव वाचवता येणे शक्य झाले असते. मात्र, तसे न करता तेथील सरकारकडून मृत्यूची आकडेवारी लपविण्यात आली. मात्र, ज्यावेळी नागरिकांचे मृतदेह गंगेत तरंगत आले ते स्वतःसाठी न्याय मागत होते. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात जे मृत्यू झाले ते मृत्यू नाहीतर हत्या आहे असा गंभीर आरोप भीम आर्मीचे आणि आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांनी करतानाच योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील केली आहे.

भीम आर्मीचे आणि आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आजाद म्हणाले, कोरोना परिस्थितीवर काम करण्यापॆक्षा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू अशा राज्यात प्रचाराला गेले. एवढाच फिरण्याचा शौक असेल तर मुख्यमंत्रीपदावर दुसरा व्यक्ती बसवायला हवा. तसेच यावेळी त्यांनी जोपर्यंत उपेक्षितांची सत्ता येत नाही तोपर्यंत त्यांच्या अधिकारांचे हनन आणि हक्क चिरडले जाणार. पदोन्नतीमधील आरक्षण नाकारणे हे राजर्षी शाहू महाराजांच्या वैचारिक वारसांना शोभणारे नाही. या हक्कासाठी येत्या काळात येत्या काळात मुख्यमंत्र्यांच्या निवासाला घेराव घालणार असून प्रसंगी महाराष्ट्र बंद करू असा इशारा देखील दिला आहे.

अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी यांना राज्य घटनेच्या कलम १६ (४) अ नुसार पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. राज्य सरकार हे आरक्षण देऊ शकते हे सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केलेले आहे. परंतु, शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेत वैचारिक वारसदार म्हणवणाऱ्यांकडून उपेक्षित समाजाची फसवणूक केली जात आहे. सरकारने गैरसमाजात राहू नये. आरक्षण मिळविण्याकरिता तीव्र आंदोलन उभे केले जाईल असे आजाद म्हणाले.

मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पूर्ण पाठींबा आहे. लोकसंख्येनुसार प्रत्येक समाजाला त्या प्रमाणात आरक्षण द्यायला हवे. त्यामुळे १०० टक्के आरक्षण लागू करावे असे आजाद म्हणाले. अनुसूचित जाती-जमाती यांनी खुल्या वर्गातून सर्व जागांवर निवडणुका लढविल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनी सुद्धा आपले खरे प्रतिनिधी निवडून सभागृहात पाठवावेत. सध्या देशात अघोषित आणीबाणी असून अधिकारांची पायमल्ली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button