पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या नावे १८ एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न
पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने वनखात्याची तब्बल १८ एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. महसूल विभागाच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार वेळीच लक्षात आला. मात्र, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हडपसरमध्ये वनविभागाच्या मालकीची 18 एकर जमीन आहे. वनविभागाची ही जमीन बळकावण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात महसूलमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांची बनावट स्वाक्षरी असलेल्या एका आदेशपत्राचा वापर करण्यात आला. हे आदेशपत्र देऊन जमीन बळकावणाऱ्या व्यक्तीने प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने जमिनीच्या सातबाऱ्यावर स्वत:चे नाव लावून घेतले होते. सध्या बाजारभावानुसार हडपसरमधील या जागेची किंमत साधारण २०० कोटी रुपये इतकी आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महसूल विभागाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.