राजकारण
गोव्यात समविचारी पक्षांशी युती करणार : ममता बॅनर्जी
पणजी : गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांशी युती करण्यास तृणमूल तयार असल्याचे पक्षाच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. त्या सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोमंतकीयांची सत्ता असावी, असेही त्या म्हणाल्या.
गोव्यात भाजपची दादागिरी चालली आहे. भाजपवाले आज माझ्या पोस्टरचे विद्रुपीकरण करत आहेत; पण एक दिवस असा येईल की देशभरात जनताच भाजपचे विद्रुपीकरण करील. गोव्याच्या चेहऱ्यावर आम्हाला हास्य पाहायचे आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोव्यात येताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर, पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे, राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव व त्यांची कन्या वालांका यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली.