Top Newsराजकारण

मलिकांच्या कन्येची देवेंद्र फडणवीसांना, तर अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस

मुंबई : घरात ड्रग्स सापडल्याचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान हिने आज कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई ड्रग्स प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा, तसेच त्यांच्या जावयाच्या घरात अमली पदार्थ सापडल्याचा दावा केला होता. दरम्यान आरोप प्रत्यारोप करत असतानाच नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे आरोप-प्रत्यारोप केले होते. दरम्यान, आता या आरोप-प्रत्यारोपावरून देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. घरात ड्रग्स सापडल्याचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक हिने आज कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच फडणवीसांनी लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी म्हटले आहे की, खोटे आरोप एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे असे आरोप करण्यापूर्वी आपण काय आरोप करत आहोत, हे जाणून घेतले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या कुटुंबाबत केलेले खोटे दावे आणि विधानांबाबत केली होती. त्याबाबत ही मानहानीची नोटीस देण्यात येत आहे. आता या प्रकरणात आम्ही मागे हटणार नाही, असेही निलोफर यांनी स्पष्ट केलं आहे.

अब्रुनुकसानीची नोटीस पाठवत अमृता फडणवीस यांचा नवाब मलिक यांना इशारा

आता नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही फोटोंवर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रुनुकसानीची नोटिस पाठवली आहे. तसेच या प्रकरणी जाहीर माफी मागून ४८ तासांत हे ट्विट डिलिट करा, अन्यथा अब्रुनुकसानीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा असा इशारा दिला आहे.

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या की, नवाब मलिक यांनी काही फोटो शेअर करून आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. त्याविरोधात मी आता आयपीसीच्या विविध कलमांखाली तक्रारीसह अब्रुनुकसानीची नोटिस पाठवण्यात येत आहे. नवाब मलिक यांनी एकतर बिनशर्त जाहीर माफी मागावी व ते ट्विट ४८ तासांत डिलिट करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button