महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर; भाजप नेते प्रवीण दरेकरांना उपरती
रत्नागिरी : विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते रत्नागिरीत कोरोना हॉस्पिटलचं लोकार्पण करण्यात आलं.जिल्ह्यातील चार कोरोना सेंटर्सचे लोकार्पण करण्यात आले. दरेकर यांनी यावेळी महाराष्ट्र दुर्दैवानं तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संकटात भाजपने नेहमी मदत केली आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
चिपी विमानतळावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात कलगीतुरा सुरु आहे. असं असताना मुख्यमंत्री चिपी विमानतळाच्या उदघाटनासाठी आले तर आनंद आहे. या विमानतळाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येवून कोकणचा विकास होणार असेल तर त्याचे स्वागत आहे, अशी भूमिका विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मांडलीय. विकासासाठी स्पर्धा करा सिंधुदुर्गप्रमाणे कोकणात नवीन विमानतळ उभारण्यासाठी स्पर्धा करा असा सल्ला दरेकर यांनी शिवसेनेला दिलाय.
महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आमदार निधी मिळत नसल्याने व्यथिक आहेत. शिवसेना राष्ट्रवादीच्या जाळ्यात अडकलीय. राष्ट्रवादीकडे अर्थमंत्री पद आहे शिवसेना आमदारांना त्यांच्या हक्काचा निधी देखिल मिळत नाहीय असा आरोप देखिल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलाय.