नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढ आहे. यातच महाराष्ट्र कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट बनत आहे. राज्यात दिवसाला जवळपास १५ हजारापेक्षा अधिक नव्या कोरोना रुग्णांची पडत आहे. यावर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाही राज्य प्रशासन गंभीर नसल्याचे आरोप पत्राद्वारे केला होता. यातच आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही महाराष्ट्राच्या कोरोना लसीकरणावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राच्या लसीकरणावरुन ठाकरे सरकारवर टीका करत ट्वीट केले की, ”केंद्राने महाराष्ट्र सरकारला ५४ लाख लसींचा साठा पाठवला आहे. परंतु १२ मार्चपर्यंत यातील फक्त २३ लाख लसींचा साठा वापरला आहे. त्यामुळे ५६ टक्के लसीचा साठा असाच पडून राहिला आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात लसीचा साठा शिल्लक असतानाही शिवसेनेचे खासदार राज्यासाठी आणखी अतिरिक्त लसीची मागणी करत आहेत. याआधी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळीही राज्य सरकारने गोंधळ घातला होता. आणि आता कोरोना लसीकरणातही तेच सुरु असल्याचा आरोप जावडेकरांना केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, शिवसेनेचे खासदार सांगतात की महाराष्ट्राला लसी द्या. राज्यसभेमध्ये शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी मागणी केली होती की, महाराष्ट्राला अधिक प्रमाणआत लसी देण्यात याव्यात. त्याशिवाय महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केंद्राकडे विनंती केलेली की महाराष्ट्राला लसींचा जास्त पुरवठा व्हावा.
यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. केंद्र लसी पुरवतं, मात्र महाराष्ट्र सरकार त्या वापरतच नाही, असा सूर त्यांच्या ट्विटमधून दिसून येत आहे.
केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याला लस वितरित करण्यात येत आहेत. त्यात महाराष्ट्राला ५४ लाख लसींचा पुरवठा झाला आहे. मात्र त्यातील १२ मार्चपर्यंत केवळ २३ लाख लसीच लोकांना देण्यात आल्या आहेत, असा दावाही जावडेकर यांनी केला आहे. त्यामुळे पहिले कोरोना महामारीची स्थिती आणि आता लसीकरण मोहिमेतही ठाकरे सरकार कुठेतरी कमी पडतंय, असंही जावडेकरांचं म्हणणं आहे.