डेटॉल बीएसआय महिला बाईक रॅलीद्वारे ५ राज्यामध्ये स्वच्छता, पौष्टिकतेबद्दल जागरूकता
मुंबई : रिच इच चाईल्ड या मोहिमेच्या यशस्वीततेचा आनंद साजरा करत, मागील दोन वर्षांपासून १६,००० पेक्षा अधिक मुलांचे जीवन प्रभावीपणे वाचविण्यासाठी,सात महिला दुचाकी चालकांचा समावेश असलेल्या उत्साही गटाने ६ दिवसात ५ राज्यातून १५९१ इतके अंतर पार करत त्यांची बाईक रॅली यशस्वीपणे पूर्ण केली आहे. या बाईक रॅलीचा हेतू महाराष्ट्रातील अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यातील महिलांच्या धैर्यशील भावना आणि प्रेमाच्या भावनेला वंदन करणे सशक्त करणे तसेच ते कायम ठेवणे हे आहे. रिच इच चाईल्ड या मोहिमेच्या साहाय्याने या शहरांतील महिला स्वच्छतेचा अवलंब करून, आहारातील विविधता सुनिश्चित करुन आणि सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये प्रवेश करत त्यांच्या मुलांचे जीवन वाचविण्यासाठी सक्षम झाल्या आहेत. रिच इच चाईल्ड उपक्रम प्लॅन इंटरनेशनल (इंडिया चॅप्टर) द्वारे राबविला जात आहे, ज्याला प्लॅन इंडिया म्हणून ओळखले जाते.
गुरुग्राम येथून #LoveforKids बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या रॅलीला विविध स्थानिक शासन आणि गुरुग्राम, ग्वालियर, इंदूर, नंदुरबार आणि अमरावती (महाराष्ट्र) येथील प्रशासनाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. द एक्स्ट्रा ऑर्डीनरी एफर्ट, आउटकम ऑफ रिच इच चाईल्ड आणि बनेगा स्वस्थ इंडिया या मोहिमेला शहर प्रशासकांद्वारे मान्यता मिळाली तसेच त्यांनी या मोहिमेस पाठिंबा देण्याचे आश्वासन देखील दिले.
या यशस्वी आणि अद्वितीय उपक्रमाबद्दल बोलतांना रवी भटनागर (डायरेक्टर एक्सटर्नल अफेयर्स आणि पार्टनरशीप-हेल्थ एएमइएसए, रेकिट बेंकायजर) म्हणाले की, बनेगा स्वस्थ इंडिया या उपक्रमाने स्वच्छता आणि पौष्टिकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी नेहमीच एक महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आणि हि बाईक रॅली अशाच एका प्रयत्नांपैकी एक आहे जे छोट्या मुलांच्या कुपोषणाच्या समस्ये विरुद्ध लढा देऊन यशस्वीपणे मात करण्याची भावना दर्शविते. मला आशा आहे की येणाऱ्या ५ वर्षात या उपक्रमाचा ९ राज्यांतील २ दशलक्ष कुपोषित मुलांच्या आई पर्यंत विस्तार होईल, असे देखील ते यावेळी म्हणाले.
या रॅलीच्या माध्यमातून ५२ आरोग्य कर्मचारी, १४ जिल्हा अधिकारी, ३ एमपी-आमदार-कुलगुरू, ८० महिला आणि ५३ मुलांना स्वछता आणि पोषण किती महत्वाचे असते हा संदेश मिळाला. यावेळी मान्यवर आणि प्रमुख पाहुण्यांनी वार्षिक प्रकल्प अहवाल,एसआरओआय अहवाल आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक छोटे रोपटे सादर केले.
यावेळी स्वतःचा अनुभव सामायिक करत एक आई म्हणून महिला दुचाकी चालक म्हणाली की, बाल-कुपोषण हि आपल्या समाजातील एक गंभीर समस्या असून मुलांचे प्राण वाचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि म्हणूनच रिच इच चाईल्ड या मोहिमेचा भाग असण्याचा मला अत्यंत आनंद आहे. मी डेटॉल आणि बनेगा स्वस्थ इंडियाच्या टीमचे त्यांच्या अप्रतिम उपक्रमाबद्दल अभिनंदन करते तसेच ते समोर सुद्धा अशा प्रकारे मुलांचे प्राण वाचवत राहतील अशी आशा करते.
यावेळी मोहम्मद असिफ (कार्यकारी संचालक, प्लॅन इंडिया) म्हणाले की, द रिच इच चाईल्ड या मोहिमेला, ग्रामीण भागातील कुपोषणाच्या समस्या यशस्वीरित्या सोडविण्यासाठी सरकार, कॉर्पोरेट आणि नागरी संस्था यांच्या कडून देखील मदत मिळाली आहे. या बाईक रॅलीमुळे आमच्या कामगारांना अपार प्रमाणात धैर्य आणि उर्जा मिळाली आहे. तसेच येणाऱ्या काळात आम्हाला काही अद्वितीय परिणाम पहायला मिळतील अशी आशा आहे.