Top Newsराजकारण

विधान परिषद निवडणूक : विदर्भातील २ जागांचा आज निकाल

नागपूर: विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर विदर्भातील नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि काँग्रेसवर ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली होती.छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलेला. आज या निवडणुकीची मतमोजणी होत असून कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.

नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली. तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र,मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. या घटनेमुळं नागपूर विधान परिषद मतदारसंघात सध्या तरी भाजपचं पारडं जड दिसत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

अकोला बुलडाणा वाशिमध्ये चुरशीची लढत

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे विजयाचा जॅकपॉट ठरणार आहेत. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे. शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील २२ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले.तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या ८२२ मतदारांपैकी ८०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्के बजावला.बाजोरिया निवडून आले तर बाजोरियांचा हा चौथ्यांदा विजय ठरेल. जर बाजोरिया यांचा पराभव होऊन वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला तर पाहिल्यांदाच विधान परिषद मध्ये कमळ फुलेल असल्याने यात कोण बाजी मारते याकडे सर्वांचे कक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button