पणजी : देशाचा टेनिस स्टार लिएंडर पेस याने शुक्रवार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच बरोबर लिएंडर पेसचे याने राजकारणात पदार्पण झाले आहे आणि क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो राजकीय क्षेत्रात कशी कामगिरी दाखवेल याकडे देशाचं लक्ष राहील.
I live in Goa. I Was born in Bengal, I’ve travelled the length and breadth of the nation. At the end of the day I am a patriotic Indian. For me it's about doing India proud & to make a difference and give back to my roots. @MamataOfficial Didi's vision is to make India, (1/2) pic.twitter.com/JpQ7TvlQ0N
— Leander Paes OLY (@Leander) October 29, 2021
लिएंडर म्हणाला की, मी गोव्यात राहतो आणि माझा जन्म बंगालमध्ये झाला आहे. मी संपूर्ण देशाचा प्रवास केला आहे. पण आखेर मी एक भारतीय आहे. माझ्यासाठी भारताचा अभिमान बाळगणे आणि बदल घडवून आणणे माझं काम आहे. ममता बॅनर्जी आज २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा दौऱ्यावर आहेत, तिथे त्यांच्या उपस्थितीत लिएंडरने पक्षात प्रवेश केला. आभिनेत्री नफिसा अली आणि कार्यकर्त्या मृणालिनी देशप्रभू यांनी देखील पक्षात प्रवेश केला. २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस आपली पकड मजबूत करण्याची प्रयत्न करत आहे. ममता बनर्जी गुरुवारी संध्याकाळी गोव्याला पोहोचल्या आणि आज तृणमूल काँग्रेसची गोव्यात पकड मजबूत करण्यास सुरूवात केली. गोवा हा बीजेपीचा गड मानला जातो.
Warmly welcoming legendary sportsperson @Leander who joined us today in the presence of our Hon'ble Chairperson @MamataOfficial!#GoenchiNaviSakal https://t.co/o05ddcH0Qb pic.twitter.com/PRgqvVhp1R
— AITC Goa (@AITC4Goa) October 29, 2021