राजकारण

ज्युलिओ रिबेरोंचा लेटरबॉम्ब प्रकरणाची चौकशी करण्यास नकार

बदली झाल्यावर पत्र लिहिणे, आरोप करणे अयोग्य! हे खालच्या दर्जाचे राजकारण!

मुंबई : परमबीर सिंग यांना जेव्हा गैरव्यवहाराची माहिती मिळाली तेव्हाच त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडायला हवी होती. बदली झाल्यावर ते असे आरोप करीत आहेत. अशा प्रकारचे पत्रे लिहिणे हे पोलिस अधिकाऱ्याचे काम नाही. हे खालच्या दर्जाचे राजकारण आहे, अशी टीप्पणी करत माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास नकार दिला आहे.

राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब म्हणजेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर राज्यात एकच चर्चांचा भूकंप आला आहे. राजकीय फैरी झडल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या पत्राच्या आणि गंभीर आरोपाची चौकशी माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी करावी असे म्हटले होते. यावर माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर प्रकरणाची चौकशी करण्यास नकार दिला आहे. रिबेरो यांनी म्हटले आहे की, मला या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज नाही. या प्रकरणात अद्याप कोणाविषयीही कोणासोबत चर्चा देखील केली नाही, परंतु शरद पवार यांनी मला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे असे मी ऐकले आहे. त्यांनी आपले वय सांगितले आणि म्हणाले की मी आता ९२ वर्षांचा आहे. या वयात मी कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकत नाही. माझ्याकडे इतकी शक्ती नाही.

रिबेरो पुढे म्हणाले की, माझ्यामध्ये सामर्थ्य असले तरी मी अशा प्रकरणाची चौकशी केली नसती. कारण हे अगदी खालच्या पातळीवरचे राजकारण आहे. ते म्हणाले की, परमबीर सिंग यांना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडायला हवी होती. बदली झाल्यावर ते असे आरोप करीत आहेत. अशा प्रकारचे पत्रे लिहिणे हे एखाद्या पोलिस अधिकाऱ्याचे काम नाही. परमबीर सिंग यांच्या पत्रावर तुमचा विश्वास आहे का असे रिबेरो यांना विचारले असता. रिबेरो यांनी म्हटले आहे की, अशा अधिकाऱ्यांवर आणि राजकारण्यांवर माझा विश्वास नाही. त्यांना खोटे बोलण्याची सवय आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला आरोप ही गंभीर आहे त्यामुले यावर दिल्लीती पत्रकार परिषदेत सांगितले होते की या प्रकरणाची चौकशी ज्युलियो रिबेरो यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याने करायला हवी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button