राजकारण

जयंतरावाच्या मुलाकडून आयफेल टॉवरवरून मुलीला मागणी, आमची पोरं काय करतील याचा नेम नाही !

शरद पवारांच्या विधानाने खसखस

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आयकर, ईडीच्या कारवायांवर भाष्य केलं. लखीमपूरची हिंसा, मावळचा गोळीबार आणि महाराष्ट्र बंद यावरही भूमिका स्पष्ट केली. त्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानाचीही खिल्ली उडवली. मात्र, या गंभीर पत्रकार परिषदेतील सुरुवात त्यांनी काहीशी हटके केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचा किस्साच पवारांनी सांगितला. जयंतरावाच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केले. दोघांचं जुळलं. पण आमची पोरं काय करतील याचा नेम नाही, असं शरद पवार यांनी सांगताच एकच खसखस पिकली.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वात आधी जयंत पाटील यांच्या मुलाची बातमी दिली. आमचे सर्व सहकारी आहेत. त्यातील एकाला आनंदाची बातमी द्यायाची आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आमचा सर्वांचा दृष्टीकोण किती व्यापक झाला आहे बघा. जयंत पाटलांचे चिरंजीवांनी काल संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोझ केला. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली. आता आम्ही वाळवा-इस्लापूरपर्यंत सीमित नाही आहोत. आम्ही एकदम पॅरिस वगैरे जातो. ठिकाणं इंटरनॅशनल असेल, पण दोन्ही मुलं-मुली डोमेस्टिक आहेत. स्थानिक आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल, असं सांगतानाच आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं कुठं जाऊन काय करतील हे सांगता येत नाही, असं पवार म्हणाले. पवारांच्या या विधानानंतर एकच खसखस पिकली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button