राजकारण

माफी न मागितल्यास जावेद अख्तर यांच्या चित्रपटांचं स्क्रिनिंग होऊ देणार नाही; राम कदमांचा इशारा

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच आहे, असं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं होतं. तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचं सांगत त्यांनी तालिबानवर टीकेची झोड उठवली. याचवेळी भारताचं तालिबान कधी होऊ शकत नाही, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. परंतु त्यांच्या वक्तव्यावरून आता रोष व्यक्त केला जात आहे. भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी जावेद अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

जावेद अख्तर यांचं वक्तव्या हे केवळ दुर्दैवी नाही तर, संघ, विश्व हिंदू परिषदेच्या कोट्यवधी कार्यकर्ते आणि जगभरातील या विचारधारेला मानणारे कोट्यवधी लोकांचा अपमान आहे! जोपर्यंत जावेद अख्तर हाथ जोडून माफी मागत नाही तोपर्यंत त्याची, त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही चित्रपट या भूमित चालू देणार नाही. संघटनांचे कार्यकर्ते गरीब व्यक्तींची सेवा करतात आणि यांनी त्यांचा अपमान केला आहे. हे वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी हा विचार केला पाहिजे होता की एकाच विचारधारेची लोकं आता सरकार चालवत आहेत. राजधर्म पूर्ण करत आहेत. जर तालिबानी विचारधारा असती तर त्यांना हे वक्तव्य करता आलं असतं का? यावरून त्यांचं वक्तव्य किती पोकळ आहे हे समजतं, असंही ते म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button