राजकारण

‘जनता कर्फ्यू’ – शिस्तीचं अभूतपूर्व उदाहरण : पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

नवी दिल्ली : देशभरासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या संसर्गाने कहर करण्यास सुरूवात केली आहे, असे चित्र रोज येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवरून लक्षात येत आहे. देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेवर नियंत्रित मिळवल्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. नरेंद्र मोदींनी कोरोना लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूच्या काही आठवणींना देखील उजाळा दिला. यासह त्यांनी ‘जनता कर्फ्यू’ने जगासमोर नवा आदर्श निर्माण केला असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून म्हणाले, गेल्या वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण देशासाठी आदर्श उदाहरण ठरला. शिस्तीचं हे अभूतपूर्व असं उदाहरण होतं. येणाऱ्या पिढ्यांना गोष्टींचा गर्व वाटेल, असे मोदी म्हणाले.

तसेच कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे हे सर्व कोरोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेलं आहे. त्यामुळेच कोरोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिले. गेल्या वर्षी कोरोना लस कधी येणार? हा सर्वांना प्रश्न पडला होता. पण आता आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे” असेही मोदी म्हणाले.
यापुढे मोदी म्हणाले, ”स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी कष्ट सहन केले. देशासाठी बलिदान देणे हे आपले कर्तव्य आहे असे ते मानत असत. त्यांच्या त्याग आणि बलिदानाच्या अमर कहाण्या आपल्याला आता सदैव कर्तव्याच्या मार्गाने जाण्यासाठी प्रेरित करत राहोत. कोरोनाच्या या सर्व परिस्थिती दरम्यान, #COVID19 शी लढा देण्याचा मंत्र पण नक्की लक्षात ठेवा. ‘दवाई भी – कडाई भी’ ! आणि आपल्याला फक्त बोलायचेच आहे असे नाही, आपल्याला ते प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे, आणि लोकांनाही ‘दवाई भी कडाई भी’ असे वागण्यासाठी वचनबद्ध करायचे आहे”, असे आवाहन देखील मोदींनी जनतेला केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button