राजकारण

जैसा गांव वैसा भेष…! चर्चा फक्त मोदींच्या लुकची !

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान मोदी नेहमीच त्यांच्या लुकमुळे चर्चेत असतात, मोदी साऊथला गेले कधी लुंगी नेसतात तर दुसऱ्या राज्यात गेले की तिकडचा वेश परिधान करतात, आज मात्र मोदी पुन्हा त्यांच्या हटके लुकमुळे चर्चेत आले आहेत. प्रजासत्ताक दिनानंतर होणारी एनसीसी रॅली दिल्लीतील करिअप्पा मैदानावर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पोहोचले, त्यांचा लूक वेगळा होता. त्यांचा हा नवा लुक सर्वांचे आकर्षण ठरला. शीख पगडी परिधान केलेल्या पंतप्रधान मोदींना एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला. ही रॅली १९५३ पासून दरवर्षी आयोजित केला जाते. रॅलीत १००० एनसीसी कॅडेट्सच्या मार्चपास्टची सलामी घेतली. यावेळी एनसीसी कॅडेट्सनी जमिनीवर आणि हवेत आपले कौशल्य दाखवले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडी ब्रह्म कमळसोबत काळी टोपी घातली होती, जी खूप चर्चेचा विषय बनली होती. या टोपीसोबत कुर्ता पायजमामा आणि मणिपुरी गमछा घातला होता. पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांशी मोदींच्या पेहरावाची जोड देऊन प्रजासत्ताक दिन सर्वांनी पाहिला. आज त्यांनी शीख पगडी घातली होती. निवडणुका असणाऱ्या पाच राज्यापैकी पंजाब हेही एक राज्य आहे, त्यामुळे मोदींची पगडी पंजाबशी जोडली जात आहे. मोदी ज्या राज्यात जातात तिथला वेश परिधान करून तिथल्या लोकांची मनं जिकण्याचा प्रयत्न करतात. आता पाच राज्याच्या निवडणुका आहेत, त्यामुळे मोदी तिथल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी असे वेश परिधान करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

मोदी म्हणाले, आज जेव्हा देश नवनवीन संकल्पांसह पुढे जात आहे, तेव्हा देशात एनसीसी मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी देशात उच्चस्तरीय आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे. एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आपण सर्वांनी समस्येच्या मुळाशी जोडले गेले पाहिजे. तुमच्या जिद्द आणि पाठिंब्याने आम्ही भारताचे भविष्य बदलू शकतो. पीएम मोदींनी तरुणांना ड्रग्जपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, त्याविरुद्ध लढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ज्या शाळा-कॉलेजमध्ये एनसीसी आहे, एनएसएस आहे तिथे ड्रग्ज कसे पोहोचू शकतात? असेही ते म्हणाले. एक कॅडेट म्हणून तुम्ही स्वतः ड्रग्जपासून मुक्त असले पाहिजे आणि त्याचवेळी तुमचा परिसर ड्रग्जपासून मुक्त ठेवा. तुमच्या साथीदारांना, जे एनसीसी-एनएसएसमध्ये नाहीत त्यांनाही ही वाईट सवय सोडण्यास मदत करा. असे आवाहन यावेळी मोदींनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button