अर्थ-उद्योग

जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरकडून एनवीडियासोबत सहयोगाची घोषणा

गेडन, यूके/सांता क्‍लारा, सीए : जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरने आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) व कम्‍प्‍युटिंगमधील अग्रणी एनवीडियासोबत बहुवार्षिक धोरणात्‍मक सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत संयुक्‍तपणे ग्राहकांसाठी नेक्‍स्‍ट-जनरेशन ऑटोमेटेड ड्रायव्हिंग सिस्टिम्‍स, तसेच एआय-सक्षम सेवा व अनुभव विकसित व वितरित करण्‍यात येतील.

२०२५ पासून सर्व नवीन जग्‍वार व लॅण्‍ड रोव्‍हर वाहने एनवीडिया ड्राइव्‍ह सॉफ्टवेअर-परिभाषित व्‍यासपीठावर निर्माण करण्‍यात येतील, ज्‍यामधून सक्रिय सुरक्षितता, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग व पार्किंग सिस्टिम्‍स, तसेच ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्टिम्‍सची व्‍यापक श्रेणी मिळेल. वाहनाच्‍या आतील सिस्टिममध्‍ये एआय वैशिष्‍ट्यांसह ड्रायव्‍हर व प्रवाशी मॉनिटरिंग, वाहनाच्‍या स्थितीचे प्रगत व्हिज्‍युअलायझेशन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असतील.

हे फुल-स्‍टॅक सोल्‍यूशन एनवीडिया ड्राइव्‍ह हायपेरिऑनवर आधारित आहे, ज्‍यामध्‍ये ड्राइव्‍ह ओरिन केंद्रिकृत एव्‍ही कम्‍प्‍युटर्स, ड्राइव्‍ह एव्‍ही व ड्राइव्‍ह आयएक्‍स सॉफ्टवेअर, सुरक्षा, सुरक्षितता व नेटवर्किंग सिस्टिम्‍स, सराऊंड सेन्‍सर्स आहेत. ड्राइव्‍ह ओरिन हे कारचे एआय वैशिष्‍ट्य आहे आणि जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हर ऑपरेटिंग सिस्टिमवर संचालित आहे. ड्राइव्‍ह हायपेरिऑन ही मध्‍यवर्ती मुख्‍य यंत्रणा आहे.

जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हर रिअल-टाइम फिजिकली अचूक सिम्‍युलेशनसाठी एनवीडिया ओम्नीव्‍हर्स वर निर्माण करण्‍यात आलेले प्रशिक्षित एआय मॉडेल्‍स व ड्राइव्‍ह सिम सॉफ्टवेअरकरिता एनवीडिया डीजीएक्‍ससोबत इन-हाऊस विकसित केलेल्‍या डेटा सेंटर सोल्‍यूशन्‍सचा देखील लाभ घेईल. जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरची सॉफ्टवेअर-परिभाषित वैशिष्‍ट्ये आणि त्‍यांचे एण्‍ड-टू-एण्‍ड सत्‍यापन व मूल्‍यांकन आर्किटेक्‍चर ओव्‍हर-दि-एअर सॉफ्टवेअर अपडेट्सच्‍या माध्‍यमातून वाहनाच्‍या संपूर्ण जीवनचक्रादरम्‍यान नवोन्‍मेष्‍कारी सहाय्यक व ऑटोमेटेड ड्रायव्हिंग सेवा देईल.

जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी थायरी बोलोरे म्‍हणाले, ”उद्योग अग्रणी एनवीडियासोबत सहयोग आणि माहितीची देवाणघेवाण आमच्‍या रिइमॅजिन धोरणाला ओळखण्‍यासाठी आणि दर्जा, तंत्रज्ञान व स्थिरतेमध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करण्‍यासाठी आवश्‍यक आहे.

जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हर सर्वात सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांसाठी जगातील सर्वात हवेहवेसे वाटणारी लक्‍झरी वाहने व सेवांची निर्माता बनेल. एनवीडियासोबतचा आमचा दीर्घकालीन धोरणात्‍मक सहयोग आमच्‍या भावी वाहनांसाठी संभाव्‍यतांना व्‍यापून घेईल आणि व्‍यवसाय प्रत्‍यक्ष जागतिक, डिजिटल पॉवरहाऊसमध्‍ये बदलण्‍याच्‍या प्रक्रियेला सुरू ठेवेल.”

एनवीडियाचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेन्‍सेन हुआंग म्‍हणाले, ”नेक्‍स्‍ट-जनरेशन कार्स ऑटोमोटिव्‍हला सर्वात मोठ्या व सर्वात प्रगत तंत्रज्ञान उद्योगक्षेत्रांमध्‍ये रूपांतरित करतील. सॉफ्टवेअर-परिभाषित, प्रोग्रामेबल कार्सचा ताफा वाहनांच्‍या टिकाऊपणासाठी नवीन कार्यक्षमता व सेवा देईल. आम्‍हाला परिवहनाच्‍या भविष्‍याला नवीन रूप देण्‍यासाठी आणि सर्वात प्रगत कार्सची निर्मिती करण्‍यासाठी जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.”

जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरचा २०३९ पर्यंत त्‍यांची पुरवठा साखळी, उत्‍पादने व कार्यसंचालनांमध्‍ये नेट-झीरो कार्बन उत्‍सर्जन संपादित करण्‍याचा मनसुबा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button