Top Newsस्पोर्ट्स

आयपीएल : हैदराबादचा बंगळुरुवर निसटता विजय

अबुधाबी : आयपीएल २०२१च्या गुणतक्त्यात अव्वल दोन संघांत एन्ट्री मारण्याचे विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण झाले नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं बुधवारी उत्तम सांघिक कामगिरी केली, परंतु त्यांना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून सडेतोड उत्तर मिळाले. भुवनेश्वर कुमारनं अखेरच्या चेंडूपर्यंत सामना ताणला अन् एबी डिव्हिलियर्ससारखा फलंदाज समोर असूनही बंगळुरूला पराभवाचा धक्का दिला. अवघ्या ४ धावांच्या फरकाने आरसीबी पराभूत झाली. यंदाच्या पर्वातील हा ५२ वा सामना अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर पार पडला. आरसीबी याआधीच प्लेऑफमध्ये गेली असून हैद्राबादचं स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. त्यामुळे सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा नसला तरी आरसीबीसाठी हा त्यांचा आयपीएलमधील १०० विजय असणार होता.

सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीने गोलंदाजी निवडली. हा निर्णय सुरुवातीला त्यांच्यासाठी बरोबर ठरला. कारण आरसीबीने हैद्राबाद संघाला १४१ धावांवर रोखलं. ज्यामुळे बंगळुरूसमोर १४२ धावांचेच लक्ष्य होते. पण हे लक्ष्य त्यांना निर्धारीत २० षटकांत पूर्ण करता न आल्याने अखेर आरसीबीचा संघ पराभूत झाला. आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं सलामीच्या जोडीत प्रयोग केला. वृद्धीमान सहाएवजी हैदराबादनं डावखुऱ्या अभिषेक शर्मा व जेसन रॉय ही जोडी उतरवली. पण तो १३ धावांवर बाद झाला. कर्णधार केन विलियम्सन (३१) याचे कव्हर ड्राईव्ह नेत्रदीपक होते. त्यानं जेसन रॉयसह दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. प्रियाम गर्गला आज स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली, परंतु अवघ्या १५ धावा करून तो माघारी परतला. रॉयनं ४४ धावा केल्या, डॅनिएल ख्रिस्टीयननं स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याचा अफलातून झेल टीपला, हर्षल पटेलनं सातत्य कायम राखताना हैदराबादला तीन धक्के दिले. हैदराबादला ७ बाद १४१ धावांपर्यंतच मजल मारता आली.

विराट कोहलीनं पहिलाच चेंडू सीमापार टोलवून दणक्यात सुरुवात केली, परंतु भुवनेश्वर कुमारनं त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला पायचीत केलं. बढती मिळालेला ख्रिस्टिटन १ धाव करून सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. श्रीकर भरतनं (१२) सुसाट षटकार खेचून सर्वांचे लक्ष वेधले खरे, परंतु त्यालाही ( १२) मोठी खेळी करता आली नाही. दरम्यान, देवदत्त पडिक्कल व ग्लेन मॅक्सवेल यांनी बंगळुरूचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना हैदराबादची विजयाच्या दिशेनं वाटचाल करून दिली. पण, या दोघांचाही ताळमेळ चुकला. ग्लेन मॅक्सवेल ४० धावांवर धावबाद झाला.

मॅक्सवेल बाद झाल्यानं धावा व चेंडू यांच्यातील अंतर वाढू लागले आणि देवदत्तवर दडपणही वाढले. त्याच ओझ्याखाली त्यानं राशिद खानला विकेट दिली. राशिदनं टाकलेला चेंडू देवदत्तनं (४१) डिप मिडविकेटच्या दिशेनं टोकावला, परंतु अब्दुल समदनं सुरेखरित्या तो टिपला. एबी डिव्हिलियर्स व शाहबाज अहमद यांनी बंगळुरूला विजय मिळवून देण्यासाठी जोरदार फटकेबाजी केली. १९व्या षटकात जेसन होल्डरच्या पहिल्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमारनं शाहबाजचा झेल सोडला अन् तिथे सामना फिरला. पण, चौथ्या चेंडूवर होल्डरनं ही विकेट मिळवलीच.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button