अर्थ-उद्योगतंत्रज्ञान

पहिल्या mach33.aero अ‍ॅक्सलरेटर अँड इनक्युबेशन प्लॅटफॉर्मची स्थापना

बेंगळुरू : टाटा ट्रस्टच्या पाठिंब्याने राबविल्या जाणा-या सोशल अल्फा उपक्रमाने नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनआरडीसी, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागांतर्गत चालविण्यात येणारा सार्वजनिक उपक्रम) आणि काउन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर)चा एक भाग असलेल्या सीएसआयआर– नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीज (एनएएल)च्या साथीने आज mach33.aero च्या स्थापनेची घोषणा केली.

mach33.aero हा एअरोस्पेस क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या अंमलबजावणीस गती देण्यावर भर देणारा सार्वजनिक-खासगी भागीदारीतून साकारणारा भारतातील पहिला प्रकल्प असणार आहे. mach33.aero अंतर्गत एअरोस्पेस आणि संबंद्ध अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या जोपासनेसाठी सीएसआयआर-एनएएलच्या बेंगळुरूस्थित कॅम्पसमधील स्वतंत्र, अद्ययावत केंद्रामध्ये एक आधार देणारी परिसंस्था विकसित केली जाणार आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन एन टाटा म्हणाले, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, सीएसआयआर-एनएएल आणि एअरोस्पेस इंजिनीअरिंग क्षेत्रातील नवसंकल्पनांचे उपयोजन विमान उड्डाण, संरक्षण, कृषी आणि हवामान तंत्रज्ञानांपर्यंतच्या अनेक क्षेत्रांमध्ये आहे. या उपक्रमातून उच्च परिणाम साधणा-या आणि मोठ्या प्रमाणात राबविता येण्याजोग्या उपाययोजना हाती येतील व त्यातून देशामध्ये तंत्रज्ञान उद्योजकतेची एक नवी लाट निर्माण होईल, अशी मला आशा आहे.

हवाई उड्डाण, संरक्षण, अवकाश संशोधन आणि हवामानविषयक कृती इत्यादी क्षेत्रांवर mach33.aeroचा भर असणार आहे. याची ‘लॅब-टू-मार्केट’ कार्यपद्धती नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उद्योजकतेला गती देणा-या उत्प्रेरकाचे काम करेल व त्याचवेळी राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्षेत्रांतील स्टार्ट-अप्स आणि एसएमईंचा पुरस्कार करेल. mach33.aero हा उपक्रम प्रगत यंत्रणा आणि रोबोटिक्स, एआय/एमएल/डेटा सायन्स, नॅनोटेक, मटीरिअल सायन्स, प्रगत उत्पादकता, क्रायोजेनिक्स इत्यादी आघाडीच्या तंत्रज्ञानांच्या मदतीने आपल्यासमोरील काही सर्वात कठीण आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी नवसंकल्पनांचा वापर करेल.

एनआरडीसीचे चेअरमन आणि एमडी अमित रस्तोगी कमोडोर (निवृत्त) अमित रस्तोगी म्हणाले, mach33.aeroचे जेव्‍ही पार्टनर म्हणून एनआरडीसीने भारतातील आणि परदेशातील वैज्ञानिक आणि औद्योगिक समुदायांशी घट्ट नातेसंबंध प्रस्थापित केले आहेत आणि संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था व उद्योग यांचे एक विस्तृत जाळे विकसित केले आहे. तसेच मोठ्या संख्येने लघु आणि मध्यम उद्योगांना ५००० हून अधिक तंत्रज्ञान परवाना करार करून देत देशी तंत्रज्ञानाच्या यशासाठी व संपत्तीच्या निर्मितीसाठी मार्ग सुकर करून दिला आहे. स्टार्ट-अप्स स्थापन करून त्या यशस्वीरित्या चालविण्याच्या आपल्या अनुभवाच्या आधारे mach33.aero च्या इनक्युबेटीजना आयपीआरचा शोध घेणे, विश्लेषण, फाइलिंग, बाजारपेठेचे सर्वेक्षण, व्यवहार्यता, रिपोर्ट, तांत्रिक सल्लागार सेवा, तज्ज्ञांचा सल्ला इत्यादी आणि/किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक सेवा पुरवून त्यांना आधार देण्याचे काम एनआरडीसी करेल.

डीएसआयआर अ‍ॅण्‍ड डीजी, सीएसआयआरचे सेक्रेटरी डॉ. शेखर सी. मांडे यांनी mach33.aero चे व्हर्च्युअल उद्घाटन करताना देशातील पहिलेवहिले इनक्युबेशन सेंटर स्थापन केल्याबद्दल आणि एअरोस्पेस व संबंद्ध अभियांत्रिकी क्षेत्रातील स्टार्ट-अप्सची जोपासना केल्याबद्दल टीम सोशल अल्फा, एनआरडीसी आणि सीएसआयआर-एनएएलचे अभार मानले. यामुळे स्टार्ट-अप्स आणि एसएमईंना या राष्ट्रीय पातळीवरील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करण्यासाठी सहाय्य मिळू शकेल व त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करता येईल. ते पुढे म्हणाले, mach33.aero मुळे स्पेसटेक, संरक्षण, हवाई वाहतुक, कृषी, हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि विमा व हवामानाचा अंदाज अशा विविध क्षेत्रांतील अनेक उपयोजनांमध्ये तांत्रिक नवसंकल्पनांची सखोल रुजवण होऊ शकेल तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन मिळू शकेल.

सखोल विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणा-या स्टार्ट-अप्सचा ‘प्रयोगशाळा-ते-बाजारपेठ’ हा प्रवास घडून येण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे व त्यात अनेक स्तरांवर नाविन्यपूर्ण कार्यपद्धतींची निवड करण्याची आणि या कार्यपद्धतीमधील जोखमी दूर करण्याची गरज असते. या अभिनव संकल्पना विकसित करणा-यांना उत्पादन-बाजारपेठ समतोल साधण्यासाठी, प्रायोगिक प्रकल्प राबविण्यासाठी आणि वैधता, भांडवलाची उपलब्धता, नियामक अटीशर्थींमध्ये बसण्यासाठीचे मार्ग शोधणे या कारणांसाठी आणि त्यांच्या बाजारपेठेतील प्रवेशाला गती मिळण्यासाठी पाठबळ आणि मार्गदर्शनाची गरज भासू शकते. ध्येयाने प्रेरित अशा संस्थापकांना त्यांच्या ‘प्रयोगशाळा-ते-बाजारपेठ’ अशा संपूर्ण प्रवासामध्ये पाठबळ देण्यासाठी सोशल अल्फाच्या रचनेमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांची अंमलबजावणी, इनक्युबेशन अर्थात प्रत्यक्ष बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करण्यासाठी मदत, गुंतवणूक परिसंस्था यांचे एकात्मिकरण करण्यात आले आहे.

या अनोख्या भागीदारीविषयी बोलताना सोशल अल्फाचे संस्थापक आणि सीईओ आणि mach33.aero चे चेअरपर्सन मनोज कुमार म्हणाले, mach33.aero मध्ये नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीजचे एअरोस्पेस संशोधन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नेतृत्वाचे स्थान, एनआरडीसीची तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणाची ताकद आणि सोशल अल्फाचे व्हेंचर डेव्हलपमेंट मॉडेल यांचा मिलाफ साधला गेला आहे. या अनोख्या भागीदारीमुळे देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट-अप परिसंस्थेला अधिकच बळकटी मिळू शकेल.

या नव्या संयुक्त उपक्रमामुळे उद्योगक्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि सरकार यांना अभिनव संकल्पना राबविण्यासाठी, देशांतर्गत उत्पादनासाठी आणि शेती, आरोग्यसेवा, हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आदी क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा दुहेरी वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणारा मंच उपलब्ध होण्याची हमी मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button