राजकारण

खा. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण प्रकरणाची चौकशी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

नवी दिल्ली : दादरा-नगर हवेली खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. यानंतर या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याची घोषणा गृहमंत्र्यांची विधानसभेत केली. मोहन डेलकर यांनी केलेल्या आत्महत्येनंतर राजकारणात अनेक चर्चेंना उधान आलं आहे तर राजकीय नेते मंडळींमध्ये याच प्रकरणावरून अनेक वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात देखील या विषयासंदर्भात चर्चा होत असून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आता थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भेट घेतली आणि एक पत्र देखील लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावर बोट ठेवत चिंता व्यक्त केल्याचे दिसतेय.“मोहन डेलकर यांची आत्महत्या हा फक्त एका जिवाचा अंत नसून तो थेट देशाच्या संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का आहे”, असे पत्रात लिहित सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सात वेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर यांनी लोकसभेत केलेल्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांच्यावर असलेल्या प्रचंड मानसिक तणावाविषयी आणि दादरा-नगर हवेलीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर टाकल्या जात असलेल्या दबावाविषयी पोटतिडकीने सांगितले होते. त्यांनी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलले. पण संसदेचे स्वातंत्र्य आणि सर्वोच्च स्थान हे सभागृहातल्या सदस्यांना कोणत्याही प्रकारच्या भिती वा दबावाशिवाय काम करण्याच्या मिळणाऱ्या वातावरणात सामावलेले आहे, असे सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईत मरिन ड्राईव्ह परिसरातल्या सी ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. खासदार मोहनभाई डेलकर हे ५८ वर्षांचे होते. ते दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत होते. भारतीय नवशक्ती पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि ते निवडूनही आले होते. १९८९ मध्ये पहिल्यांदा ते निवडून आले होते. त्यानंतर अनेकवेळा ते खासदारही राहिले होते. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती त्यामध्ये ते विजयी झाले होते. सात वेळा ते खासदार राहिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button