सॅमसंगची हिंदी युजर इंटरफेस असलेली भारताची पहिली एआय वॉशिंग मशिन श्रेणी
मुंबई : सॅमसंग या देशातील सर्वात विश्वसनीय ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने हिंदी व इंग्रजी युजर इंटरफेस असलेली भारताची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सक्षम द्विभाषिक वॉशिंग मशिन सादर केली आहे. फुली ऑटोमॅटिक फ्रण्ट लोड वॉशिंग मशिन्सची ही नवीन श्रेणी पूर्णत: भारतीयांसाठी डिझाइन करण्यात आली आहे आणि सॅमसंगचा नवीन दृष्टिकोन ‘पॉवरिंग डिजिटल इंडिया’चा भाग आहे. या श्रेणीमध्ये सॅमसंगचे प्रोप्रायटरी इकोबबल™️ व क्विकड्राइव्ह™️ तंत्रज्ञान आहे, जे वेळ व ऊर्जेची बचत करण्यासोबत कपड्यांची ४५ टक्के अधिक काळजी घेते.
उच्च दर्जाचे क्लीनिंग व स्वच्छतेची खात्री देणा-या सर्व नवीन मॉडेल्समध्ये हायजिन स्टीम तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये कपड्यांमधील गडद डाग आणि ९९.९ टक्के जीवाणू व अॅलर्जींना दूर करण्याची क्षमता आहे.
२१ नवीन मॉडेल्स असलेल्या या नवीन वॉशिंग मशिन श्रेणीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वैशिष्ट्य आहे, जे ग्राहकांना सानुकूल कपडे धुण्याच्या प्रक्रियेची खात्री देते. एआय लाँड्री प्रक्रिया जाणून घेत लक्षात ठेवते आणि सर्वात वारंवार वापरल्या जाणा-या वॉश चक्राचा सल्ला देते. ही स्मार्ट इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) सक्षम वॉशिंग मशिन श्रेणी गॅलॅक्सी स्मार्टफोन्स, सॅमसंग स्मार्ट टीव्ही व फॅमिली हब रेफ्रिजरेटर्स सारख्या सॅमसंग स्मार्ट डिवाईसेसना, तसेच अॅलेक्सा व गुगल होम सारख्या वॉइस डिवाईसेसना कनेक्ट करता येऊ शकते. ज्यामधून युजर्सना एकसंधी कनेक्टेड लिव्हिंग अनुभव मिळतो.
नवीन सॅमसंग वॉशिंग मशिन श्रेणी नवीन डिझाइनसह येते, ज्यामध्ये सुलभ जॉग डायल कंट्रोलसह अत्यंत युजर अनुकूल स्लीक डिजिटल इंटरफेस आहे.
लाँड्री अनुभव अधिक प्रभावी व सुलभ करण्यासाठी लाँड्री प्लानर युजर्सना त्यांचे कपडे धुण्याची वेळ निर्धारित करण्याची सुविधा देते. लाँड्री रेसिपी युजरने प्रविष्ट केलेले रंग, कपड्याचा प्रकार आणि कपडे भिजवण्याचे प्रमाण अशा माहितीच्या आधारावर अधिकतम वॉश चक्रासाठी ऑटोमॅटिक सुविधा देते. ज्यामुळे कोणते चक्र सर्वोत्तम आहे याबाबत अंदाज करण्याची गरज भासत नाही. होमकेअर विझार्ड युजर्सना संभाव्य समस्यांबाबत सक्रियपणे दक्ष करते आणि जलदपणे समस्येचे निवारण करते.
”महामारीदरम्यान ग्राहक सोयीसुविधेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे आणि जीवन सुलभ करणारी स्मार्ट होम अप्लायन्सेस या गोष्टीशी संलग्न आहेत. आमची नवीन एआय-सक्षम वॉशिंग मशिन श्रेणी हिंदी व इंग्रजी युजर इंटरफेससह उल्लेखनीय नवोन्मेष्कारी आहे आणि मशिन लर्निंगचा उपयोग करत ग्राहकांना सुलभ, इंटेलिजण्ट व वैयक्तिकृत लाँड्री सोल्यूशन्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही श्रेणी भारतीयांच्या विविध प्रकारच्या कपड्यांसाठी २,००० हून अधिक वॉश संयोजने व २.८ दशलक्ष बिग डेटा अॅनालिसिस पॉइण्ट्ससह सानुकूल करण्यात आली आहे. ही श्रेणी मागील एका वर्षामध्ये प्रबळपणे स्वीकारण्यात आलेली फुली ऑटोमॅटिक फ्रण्ट लोड वॉशिंग मशिन विभागामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल. आम्हाला यंदा या विभागामध्ये पहिल्या क्रमांकाची कंपनी बनण्याचा विश्वास आहे,” असे सॅमसंग इंडियाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन म्हणाले.
वॉशर्सची संपूर्ण नवीन श्रेणी ५-स्टार एनर्जी रेटिंगसह येते आणि बीईईद्वारे प्रमाणित आहे. डिजिटल इन्वर्टर तंत्रज्ञान वॉशिंग मशिन्स कमी ऊर्जेचा वापर करण्यासोबत कमी आवाज करण्याची खात्री घेते. नवीन मॉडेल्समध्ये सॅमसंगचे प्रोप्रायटरी इकोबबल™️ तंत्रज्ञान आहे, जे कपड्यांना त्वरित सामावून घेत सुलभपणे गडद डाग दूर करते आणि कपड्यांची ४५ टक्के अधिक काळजी घेते.
क्विकड्राइव्ह™️ तंत्रज्ञान युजर्सची कपडे धुण्याची वेळ जवळपास ५० टक्क्यांनी कमी करते, पण त्याबाबतीत वॉशिंग चक्राबाबत कोणतीच तडजोड करत नाही. ऑटो डिस्पेन्स प्रत्येक लोडसाठी योग्य प्रमाणात डिटर्जंट व सॉफ्टनर वितरित करते. ते जवळपास १ महिन्यापर्यंतच्या वॉशिंगसाठी डिटर्जंट कायम ठेवते. तसेच क्यू-बबल™️च्या अद्वितीय बबलिंग अल्गोरिदममधून जलद वॉश चक्रासाठी उत्तमपणे डिटर्जंट वापरण्याची खात्री मिळते आणि जवळपास ५० टक्के वेळेची बचत होते.
किंमत आणि उपलब्धता
नवीन एआय-सक्षम लाँड्री श्रेणी ३५,४०० रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीपासून भारतातील सर्व रिटेल भागीदारांकडे ६ एप्रिल २०२१ पासून उपलब्ध असेल.
निवडक मॉडेल्स अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्टोअर सॅमसंग शॉपवर उपलब्ध असतील.
नवीन वॉशिंग मशिन श्रेणी खरेदी करणा-या ग्राहकांना जवळपास २० टक्के कॅशबॅक आणि सुलभ फायनान्सिंग पर्याय जसे नो कॉस्ट ईएमआय आणि ९९० रूपये इतक्या कमी किंमतीपासून सुरू होणा-या ईएमआयचा लाभ घेता येऊ शकतो.
सॅमसंगच्या नवीन एआय-सक्षम वॉशिंग मशिन्सची वैशिष्ट्ये :
एआय कंट्रोल
सॅमसंगने स्थिर असण्यासोबत इंटेलिजण्ट एआय तंत्रज्ञानाची शक्ती असलेली प्रगत लाँड्री सोल्यूशन्स निर्माण करत नवोन्मेष्कार आणणे सुरूच ठेवले आहे. ज्यामधून कनेक्टेड व एकसंधी लाँड्री अनुभव मिळण्याची खात्री मिळते. एआय कंट्रोल्स कपडे धुण्याची प्रक्रिया सुलभ व अधिक प्रभावी करण्यासाठी लाँड्री रेसिपी, लाँड्री प्लानिंग, होमकेअर विझार्ड सारखी स्मार्ट सोल्यूशन्स आणि लोकेशन आधारित शिफारसी देतात. एआय पॅटर्न कपडे धुण्याची पद्धत जाणून घेत लक्षात ठेवते आणि योग्य वॉश चक्रांबाबत सल्ला देते. हे विशेष चक्र तुमच्या गरजा व जीवनशैलीनुसार वैयक्तिकृत व सानुकूल असण्याची खात्री घेत उत्तम लाँड्री अनुभव देते. हे वैशिष्ट्य त्रुटींचे निराकरण करण्यामध्ये देखील मदत करते, ज्यामुळे सर्विस सेंटरला कॉल करण्याची किंवा मॅन्युअल पाहण्याची गरज भासत नाही. ऑटो सायकल लिंक ड्रायरसोबत संवाद साधत परिपूर्ण ड्राइंग कोर्सची निवड करते.
इकोबबल™️
सॅमसंगचे इकोबबल™️ तंत्रज्ञान बबत जनरेटरचा उपयोग करत पाण्यामध्ये डिटर्जंट मिश्रित करते आणि त्यानंतर हवा इंजेक्ट करून साबणाचा फेस तयार करते. ही प्रक्रिया ४० पट जलद आहे. कमी मेकॅनिकल कृती व बबल कुशनसह तंत्रज्ञान कपड्यांची ४५ टक्के अधिक काळजी घेते. कोमल व सुलभ बबल अॅक्शन रोजचे बाहेर वापरले जाणारे कपडे व वॉटर रिपलण्ट फॅब्रिक्स सारख्या नाजूक कपड्यांचे संरक्षण करते. इकोबबल™️ डिटर्जंट पाण्यामध्ये योग्यरित्या मिश्रित झाले असण्यासोबत तयार झालेला साबणाचा फेस जलदपणे कपड्यांना लागण्याची खात्री घेते. सुपर इको वॉश कपड्यांना फक्त १५ अंश सेल्सिअसमध्ये धुते, ज्यामधून ४० अंश सेल्सिअसपर्यंत कपडे धुतले गेल्याची आणि फक्त ३० टक्के ऊर्जेचा वापर झाल्याची खात्री मिळते.
क्विकड्राइव्ह™️
क्विकड्राइव्ह™️ नवीन स्तरावरील वॉशिंग कामगिरी देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान लाँड्री चक्रांची गती वाढवण्यासोबत प्रक्रिया अधिक सुलभ व अधिक ऊर्जा कार्यक्षम बनवते. नाविन्यपूर्ण फॅब्रिक केअर ड्रममध्ये पल्सेटर आहे, जे प्रत्येक वेळी कपडे जलदपणे व कार्यक्षमपणे धुतले जाण्यासाठी अद्वितीय डायनॅमिक अॅक्शनची निर्मिती करते. आता तुम्ही कपडे धुण्यावर कमी वेळ व्यतित करू शकता आणि अधिक वेळ कपडे परिधान करण्याला देऊ शकता. उदाहरणार्थ, ५ किग्रॅ लोड असलेल्या सुपर स्पीड सायकलचा वापर करत क्विकड्राइव्ह™️ तंत्रज्ञान फक्त ३९ मिनिटांमध्ये संपूर्ण वॉशिंग प्रक्रिया पूर्ण करू शकते.
ऑटो डिस्पेन्स
ऑटो डिस्पेन्स कमी वेळ व परिश्रमासह कपडे धुण्याची सुविधा देते. हे वैशिष्ट्य प्रत्येक लोडसाठी आपोआपपणे योग्य प्रमाणात डिटर्जंट व सॉफ्टनर वितरित करते, ज्यामुळे २६ टक्के डिटर्जंट आणि ४६ टक्के सॉफ्टनरची बचत होते. रिफिल करण्यास सुलभ असलेले डिटॅचेबल टँक जवळपास १ महिन्यापर्यंतच्या वॉशिंगसाठी पुरेसे डिटर्जंट धरून ठेवू शकते.
अॅडवॉश
अॅडवॉश वॉश चक्र सुरू झाल्यानंतर इतर राहिलेले कपडे किंवा डिटर्जंटची भर करण्याची सुविधा देते. चक्राच्या कोणत्याही कालावधीमध्ये विसरलेले कपडे, अतिरिक्त सॉफ्टनर आणि रिन्झ-ओन्ली वस्तूंची भर करता येऊ शकते.
हायजिन स्टीम
हायजिन स्टीम ड्रमच्या तळामधून वाफ उत्सर्जित करत आणि लाँड्री प्रक्रिया परिपूर्ण करत कपड्यांना सखोलपणे स्वच्छ धुते. हायजिन स्टीम कपड्यांवरील गडद डाग आणि ९९.९ टक्के जीवाणू व अॅलर्जींना दूर करते. हायजिन स्टीम चक्रामध्ये प्रथम पाणी, धूळ व डिटर्जंट बाहेर टाकले जातात. दुसरी बाब म्हणजे वाफ करण्यासाठी थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. त्यानंतर बिल्ट–इन हिटर २० मिनिटांसाठी पाण्याला उकळवते. स्टीम टप्प्यानंतर पाण्याचा निचरा होऊन रिन्झिंग प्रक्रिया सुरू होते आणि शेवटी चक्र पूर्ण होण्यासाठी पुढील वॉशिंग प्रक्रिया केली जाते.
डिजिटल इन्वर्टर टेक्नोलॉजी
डीआयटी शांत व अधिक प्रबळ कामगिरीसाठी शक्तिशाली चुंबकांचा वापर करते, पण ब्रश असलेल्या युनिव्हर्सल मोटरच्या तुलनेत कमी ऊर्जेचा वापर करते. हे वैशिष्ट्य कपडे धुण्यासाठी ब्रशचा वापर करत नाही आणि उच्च दर्जाचे घटक व उल्लेखनीय मेकॅनिकल इंजीनिअरिंगचा वापर करत निर्माण करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाला १० वर्षांच्या वॉरंटीचे पाठबळ आहे, ज्यामधून वॉशिंग मशिनच्या दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणाची खात्री मिळते.
ड्रम क्लीन / ड्रम क्लीन+
ड्रम क्लीन कोणत्याही रसायनांचा वापर न करता वॉशरमधून धूळ व जीवाणू बाहेर काढण्याची सुविधा देते. हे वैशिष्ट्य वॉशरच्या आतील भागामधून ९९.९ टक्के जीवाणू दूर करते आणि रबर गास्केटमधून धूळ दूर करते. इंटरटेकने ड्रम क्लीन+ चक्राच्या केलेल्या चाचणीच्या आधारावर वॉशिंग मशिन आपोआपपणे युजरला क्लीनिंगच्या गरजेबाबत माहिती देते.
स्टे क्लीन ड्रॉवर
स्टे क्लीन ड्रॉवर विशेषरित्या डिझाइन केलेल्या वॉटर फ्लशिंग सिस्टमसह वॉशिंगसाठी डिटर्जंट पूर्णपणे वापरले जाण्याची खात्री घेते. म्हणजेच सर्व अवशेष डिटर्जंट किंवा सॉफ्टनरचा पूर्णपणे वापर केला जातो आणि ट्रे स्वच्छ राहतो.
बबल सोक
बबल सोक एकाच टचमध्ये विविध प्रकारच्या डागांना सुलभपणे व कार्यक्षमपणे दूर करते. हे सक्रिय बबल वैशिष्ट्य रक्त, चहा, वाइन, मेक-अप व ग्रास सारख्या विविध प्रकारच्या गडद डागांना दूर करण्यामध्ये मदत करते