अर्थ-उद्योग

भारतीय निर्देशांक काही टक्क्यांनी वधारला

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी भारतीय निर्देशांकांनी काही टक्क्यांनी वृद्धी दर्शवली. या नफ्याचे नेतृत्व ऑटो आणि आयटी क्षेत्राने केले. निफ्टी १.०७% किंवा १५७.५५ अंकांनी वधारला आणि १४,९०० अंकांपुढे म्हणजेच १४,९१९.१० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.९०% किंवा ४४७.०५ अंकांनी वाढला व ५०,२९६.८९ अंकांवर स्थिरावला. जवळपास १८१३ शेअर्सनी नफा कमावला, १६६ शेअर्स स्थिर राहिले तर ११३८ शेअर्स घसरले.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की टाटा मोटर्स (५.१६%), एम अँड एम (४.५८%), विप्रो (४.४९%), अदानी पोर्ट्स (४.०९%), आणि हिरो मोटो (४.०२%) हे निफ्टीतील टॉप लाभार्थी ठरले. तर याउलट ओएनजीसी (२.५६%), एचडीएफसी (१.१९%), डॉ. रेड्‌डीज (१.०१%), पॉवरग्रिड (०.६४%), आणि कोल इंडिया (०.४५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

क्षेत्रीयदृष्ट्या विचार करता, निफ्टी ऑटो आणि निफ्टी आयटी निर्देशांक ३% पेक्षा जास्त वधारला तर निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फार्माने जवळपास 1 टक्क्यांचा नफा कमावला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे १.५५% आणि १.६०% नी वधारले.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. चे स्टॉक्स २०% नी वाढले व त्यांनी १२४.५० रुपयांवर व्यापार केला. सरकारने या कंपनीच्या खासगीकरणाच्या अनेक बिड्स स्वीकारल्यानंतर हे परिणाम दिसले. हे व्यवहार आता दुसऱ्या टप्प्यात दिसून येतील.

सिप्ला लि.: फर्मच्या सुमाट्रिप्टॅन नसल स्प्रेला संयुक्त राष्ट्र अन्न व औषध प्रशासनची मंजूरी मिळाल्यानंतर सिप्ला लि. चे स्टॉक्स २.६८% नी वाढले व त्यांनी ८११.०० रुपयांवर व्यापार केला. मायग्रेन अटॅकच्या उपचारांकरिता हा स्प्रे वापरला जाऊ शकतो.

भारत पेट्रोलियम कॉर्प लि.: बीपीसीएलच्या बोर्डाने नुमालिंगर्थ रिफायनरीतील स्टेक विक्रीस मंजूरी दिल्यानंतर कंपनीचे शेअर्स ३.२४% नी वाढले व त्यांनी ४७०.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनी ६१.६५% स्टेक मोकळे करेल तर १३.६५% स्टेक आसाम सरकारला विकले जातील.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड: फेब्रुवारी २०२१ मध्ये एमअँडएम कंपनीने ट्रॅक्टर विक्रीत २५% वाढ दर्शवली. कंपनीच्या एकूण ट्रॅक्टर विक्रीत या महिन्यात २५% ची म्हणजे २८,१४६ युनिट्सची वाढ झाली. तर देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत २४% म्हणजेच २७,१७० युनिटची वाढ झाली. फर्मचे स्टॉक्स ४.५८% नी वाढून त्यांनी ८५७.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया: सलग दुसऱ्या दिवशी देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १९ पैशांनी वधारला व त्याने ७३.३६ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजारात संमिश्र संकेत: चिनी अधिकाऱ्यांनी अॅसेट बबलच्या जोखिमीविषयी चिंता व्यक्त केल्याने आशियाई स्टॉक्स पडले तर युरोपियन इक्विटी फ्युचर्सदेखील घसरले. जागतिक बाजाराने संमिश्र संकेत दिले. नॅसडॅक, एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० ने अनुक्रमे ३.०१%, ०.११% आणि ०.६०% ची वृद्धी घेतली. याउलट निक्केई २२५ आणि हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.८६% आणि १.२१% नी घसरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button