नवी दिल्ली: आपण कोरोना संकटाच्या वेळी रेल्वेने प्रवास करत असाल तर सामाजिक अंतराचे पालन नक्की करा. तसेच मास्कही नेहमी वापरा. वारंवार सांगूनही लोक सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे अशा गोष्टींकड दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेने आज मोठी घोषणा केलीय. जर आता कोणी रेल्वेच्या आत किंवा स्टेशनच्या आवारात मास्क परिधान करत नसेल तर त्यांच्यावर ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मास्क न घातल्याबद्दल दंड करण्याचे आदेश पुढील सहा महिने लागू राहतील. अनेक राज्य सरकारांनीही मास्क न घालण्याबाबत असे आदेश जारी केलेत. उत्तर प्रदेश सरकारने एक फर्मान जारी केलाय की, पहिल्यांदा मास्कशिवाय पकडल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल, तर दुसऱ्यांदा दंड 10 हजार रुपये असेल.