नेफ्रोप्लसकडून कोरोना रूग्णांना डायलिसिस उपचारासाठी देशातील १२० केंद्रांमधील कार्यसंचालनांमध्ये वाढ
मुंबई : नेफ्रोप्लस या भारतातील सर्वात मोठ्या डायलिसिस केअर नेटवर्क आणि देशातील डायलिसिस केअर सुविधेला पुनर्परिभाषित करणा-या आघाडीच्या कंपनीने ९० शहरांमधील १२० हून अधिक केंद्रांमध्ये कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना डायलिसिस उपचार उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या कार्यसंचालनांमध्ये वाढ करत त्यांची कटिबद्धता कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नेफ्रोप्लसचा कोविड-१९ ची लागण झालेल्या डायलिसिस रूग्णांना हॉस्पिटलमधील डायलिसिस उपचार किंवा त्यांच्या विशेषीकृत सेवा ‘डायलिसिस ऑन व्हील’ (डीओडब्ल्यू) व ‘डायलिसिस ऑन कॉल’ (डीओसी)च्या माध्यमातून केंद्रांमध्ये वेळेवर डायलिसिस केअर उपलब्ध करून देण्यामध्ये मदत करण्याचा मनसुबा आहे.
ही सेवा सर्व युनिट्समध्ये पूर्णपणे कार्यरत आहे. ब्रॅण्डने ओपीडी युनिट्समध्ये किंवा आयपी/आयसीयूमध्ये आयसोलेशन केलेल्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना डायलिसिस सेवा देण्यासाठी समर्पित केंद्रे निर्माण केली आहेत. याव्यतिरिक्त नेफ्रोप्लसने रात्रीच्या वेळी (तिसरी व चौथी शिफ्ट) हॉस्पिटल्समधील ओपीडी युनिट्समध्ये डायलिसिस सेवा देण्यासाठी विशेष तरतूदी केल्या आहेत.
दर्जाबाबत कोणतीही तडजोड न होण्याची खात्री घेण्यासाठी कंपनीने त्यांच्या सर्व केंद्रांमध्ये कुशल तज्ञांची नियुक्ती केली आहे, जे डायलिसिस केअरची गरज असलेल्या वाढत्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णांच्या गरजांची पूर्तता करतात. रेकॉर्डसनुसार मागील दीड महिन्यामध्ये नेफ्रोप्लसने ५१२ हून अधिक रूग्णांना डायलिसिस सुविधा दिली आहे आणि सध्या कंपनी दररोज प्रत्येक केंद्रामध्ये ५० हून अधिक कोविड-१९ रूग्णांना सेवा देत आहे.
नेफ्रोप्लसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम वुप्पाला याबद्दल म्हणाले, ”नेफ्रोप्लस ग्राहकांना दर्जात्मक डायलिसिस केअर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. सध्याच्या अवघड काळादरम्यान देशातील आघाडीची डायलिसिस प्रदाता कंपनी म्हणून आम्ही सर्व डायलिसिस रूग्णांना दर्जात्मक केअर सेवा देण्याची जबाबदारी घेतो आणि ठिकाण (घर किंवा हॉस्पिटल) कोणतेही असो त्यांना वेळेवर सेवा मिळण्याची खात्री घेतो. मला डायलिसिस उपचार घेत असलेल्या लोकांच्या गरजांची पूर्तत करण्याचा आणि त्यांना सद्यस्थितीचा सुलभपणे सामना करण्यामध्ये मदत करण्याचा आनंद होत आहे.”
नेफ्रोप्लसच्या गेस्ट सर्व्हिसेस विभागाचे सह-संस्थापक व संचालक कमल डी शाह याबद्दल म्हणाले, ”१२०हून अधिक ठिकाणी गंभीर मूत्रपिंड आजारांनी पीडित रूग्णांना सेवा दिल्यामुळे आम्हाला पूर्णपणे सुसज्ज असलेल्या कोविड केंद्रांमधील आमच्या अनेक ग्राहकांना सेवा देता आली आहे. भारतामध्ये डायलिसिस सेवा असलेल्या कोविड-१९ पॉझिटिव्ह रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेत आम्ही हे समर्पित डायलिसिस उपचार केंद्रे सुरू करण्याचा दृढ निर्णय घेतला. आम्हाला देशभरातील आमच्या सेवांमध्ये वाढ करण्याचा आनंद होत आहे, यामुळे आम्हाला भारतातील अधिकाधिक रूग्णांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.”