रामकार्यात तंगडं घालाल, तर आमच्याशी आहे गाठ : भातखळकरांचा शिवसेनेला थेट इशारा
मुंबई : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा, असं म्हणत त्यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम… असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अयोध्येतील राम मंदिर निर्माणात कथित जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेनेकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेने म्हटले आहे, की राम मंदिर निर्माणात काही घोटाळा झाला असेल, तर त्यात स्वतः पंतप्रधान मोदींनी लक्ष घालायला हवे. शिवसेनेने आपल्या मुखपत्र ‘सामना’त मंगळवारी म्हटले आहे, की राम मंदिर कामाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिकपणे व्हायरल हवी. कारण ती एक राष्ट्रीय गौरवाची गोष्ट आहे. तत्पूर्वी, सोमवारी शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही ट्रस्टवर निशाणा साधला होता. भाजपानेही शिवसेनेवर पलटवार केला आहे.
राममंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी @ShivSena कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेनाआदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे.
सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. #JaiShriRam pic.twitter.com/zuWh9DRnT9— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही, असं देखील याआधी अतुल भातखळकर यांनी म्हटलं होतं.
राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे भुयारी मेट्रो रेल्वे ३ चा प्रकल्प खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. कार शेड विवादामुळे आजपर्यंत या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटींनी वाढली आहे. आपला अहंकार जोपासण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट व जनतेचे हाल हेच वसुली सरकारने चालवले आहे. @OfficeofUT
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ‘चेहरा भोळा अन् भानगडी सोळा’ असं म्हणत कांजूरमार्ग कारशेडवरून शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
"कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी"…खाजगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो.
हळूहळू सत्य समोर येतेय!जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे?
चेहरा भोळा अन् भानगडी सोळा! 2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने 3 हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले.
सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही?
मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव?
कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले?
अशी बेमालूमपणे बनवाबनवी? 1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
◆मुंबई मेट्रोचे काम ठप्प होणार?
◆गेले चार महिने जपान सरकार निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला
◆वाढलेला 10 हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टतेचे फसवे कारण देऊन निधी नाकारलाश्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे
आणि विकासात सदैव आडवे घोडे!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. ‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे’ असं म्हणत निशाणा साधला आहे. मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने 3 हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी? असं शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भविष्यातील 25 हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याची ही पायाभरणी बेमालूमपणे सुरु! @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/Rz6wAQ1kfE
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
नाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून 47 कोटीचे कंत्राट देणार? गाळ कुणाच्या खिशात जाणार? @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/cNT5FWvHEF
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
जायका फंड द्यायला तयार असताना आपण का घेत नाही?
मुंबईकरांच्या मेट्रोला दिरंगाई का होतेय..? हे पाप ठाकरे सरकार का करतेय? @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/U82BtJ6kWC— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी खासगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय! जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरू आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा! अशी जोरदार टीका आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच मुंबई मेट्रोचे काम ठप्प होणार? गेले चार महिने जपान सरकार निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला. वाढलेला १० हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टतेचे फसवे कारण देऊन निधी नाकारला. श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे! असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.