शिक्षण
आयसीएसई बोर्डाच्या दहावी- बारावी परीक्षाही लांबणीवर
जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षांबाबत निर्णय
मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशातच मे महिन्यात होणाऱ्या आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. अखेर आज आयसीएसई बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीएसई दहावी बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 4 मे पासून घेण्यात येणाऱ्या आयसीएसई दहावी बारावी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जूनच्या पहिल्या आठवड्यात परिस्थिती पाहून परीक्षा बाबत निर्णय घेतला जाईल. आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन ऑप्शन (पर्याय) देण्यात आले असून एकतर दहावी बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी ऑफलाइन लेखी परीक्षा देऊ शकतात किंवा लेखी परीक्षा न देता क्रयटेरिया नुसार त्याचा निकाल जाहीर केला जाईल.