Top Newsराजकारण

विरोधकांचा प्रचंड गोंधळ; लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून एकही दिवस अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पडू शकले नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधक पेगासस हेरगिरी, कृषी कायदे, बेरोजगारी, कोरोना या मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ घालत आहेत. यामुळे आता लोकसभेची कार्यवाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधक आणि सरकारमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. संसदेतील कामकाजाबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सभागृहात अपेक्षेप्रमाणे कामकाज झाले नाही. फक्त २२ टक्के काम झाले. अधिवेशनात आतापर्यंत संविधानाच्या १२७ व्या सुधारणा विधेयकासह एकूण २० विधेयके मंजूर करण्यात आली. ६६ प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. सदस्यांनी नियम ३७७ अंतर्गत ३३१ बाबी मांडल्या.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनीही यावेळी विरोधकांनी जोरदार निशाणा साधला. या पक्षाला दोन वर्षांपासून आपला अध्यक्ष निवडता येत नाही. यांचे खासदार आपल्याच सरकारचे विधेयक फाडतात. रस्त्यावरही जे काम करायला लाज वाटेल, ते काम यांनी संसदेत केलं. लोकशाहीला लाजवेल, असे कृत्य यांनी केलंय. लाखो रुपये खर्च करुन अधिवेशन भरवलं जातं. हे लोक जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी गोंधळ करुन संसदेतून निघून जातात. काल राज्यसभेत आधी कागद फाडले, नंतर अध्यक्षांच्या खुर्चीवर फाइल फेकली, हे लाजीरवाणे आहे, अशा शब्दात अनुराग ठाकुर यांनी विरोधकांवर टीका केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button