आरोग्य

आधार कार्ड असेल तरच होम टेस्टिंग किट मिळेल : महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येतील वाढ अजूनही कायम आहे. यादरम्यान घराच्या घरी होम टेस्टिंग किट घेऊन चाचणी करण्याचे प्रमाण वाढल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले. त्यानंतर कोरोना होम टेस्टिंग किट विक्री करणाऱ्या मेडिकल आणि कंपन्यांना त्याची नोंदण करण्यास अनिवार्य केले. कारण जो व्यक्ती होम टेस्टिंग किट विकत घेत होता, तो व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर माहिती देत नव्हता. त्यामुळे आता होम टेस्टिंग किट घेताना आधार कार्ड आवश्यक असणार आहे. आधार कार्डशिवाय कोरोना होम टेस्टिंग किट मिळणार नाही, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पेडणेकर म्हणाल्या की, १३ जानेवारी २०२२पर्यंत १ लाख ६ हजार ९८७ जणांनी स्वतःची चाचणी कोरोना होम टेस्टिंग किटद्वारे केली. यामध्ये ३ हजार ५४९ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. आता आधार कार्डनंबर दिल्याशिवाय कोरोना होम टेस्टिंग किट मिळणार नाही. जर तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तर सांगा. लोकांनी घाबरू नका, तुमची तब्येत बिघडली तर आमची यंत्रणा सज्ज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button