राजकारण
सुधा भारद्वाज यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर
मुंबई : भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी सुधा भारद्वाज यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. हायकोर्टाने भारद्वाज यांचा जामीन मंजूर केला आहे. त्याचवेळी इतर आठ जणांना जामीन नामंजूर करण्यात आला आहे. ८ डिसेंबर रोजी भारद्वाज यांना विशेष एनआयए कोर्टासमोर हजर केलं जाईल. त्यानंतर त्यांना काही अटीशर्तीसंह जामीनावर सोडलं जाईल.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने मात्र या प्रकरणातील सुधीर ढवळे, महेश राऊत, व्हर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा, रोना विल्सन, शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग आणि वरावरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळला.