अर्थ-उद्योग

एचडीएफसी एर्गोची बिझनेस किश्‍त सुरक्षा सादर

मुंबई : एचडीएफसी एर्गो जनरल इन्‍शुरन्‍स या भारताच्‍या खाजगी क्षेत्रातील आघाडीच्‍या जीवनेतर विमा कंपनीने बिझनेस किश्‍त सुरक्षाच्‍या लाँचची घोषणा केली. या अद्वितीय विमाकव्‍हरचा संकट किंवा नैसर्गिक आपत्तीच्‍या स्थितीमध्‍ये एमएफआय, आर्थिक संस्‍था व बँकांच्‍या ताळेबंदाचे संरक्षण करण्‍याचा मनसुबा आहे.

वातावरणीय बदलाची वाढती समस्‍या आणि पर्यावरणावरील त्‍याचे होणारे परिणाम पाहता बिझनेस किश्‍त सुरक्षाचा पूर, भूकंप, चक्रीवादळ इत्‍यादींसारख्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे कर्जदारांकडून ईएमआय न भरण्‍याच्‍या स्थितीचा आर्थिक संस्‍थांच्‍या ताळेबंदावर होणारा परिणाम कमी करण्‍याचा मनसुबा आहे.

या लाँचबाबत बोलताना एचडीएफसी एर्गो जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीचे चीफ अक्‍चुअरी व चीफ अंडररायटिंग ऑफिसर श्री. अनुराग रस्‍तोगी म्‍हणाले, ”गेल्‍या काही वर्षांमध्‍ये पूर व चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींमध्‍ये वाढ होताना दिसण्‍यात आली आहे. या नैसर्गिक आपत्तींचा संकट-प्रवण भागांमध्‍ये राहणा-या लोकांच्‍या उदरनिर्वाहावर परिणाम होतो. तसेच अशा आपत्तींचा या भागांमधील कर्ज देणा-या व्‍यवसायांवर देखील प्रतिकूल परिणाम होतो. बिझनेस किश्‍त सुरक्षाचा या वातावरणीय बदलांसंदर्भात नुकसान भरपाई देण्‍याच्‍या, तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे वाढणा-या एनपीएपासून आर्थिक संस्‍थांचे संरक्षण करण्‍याच्‍या माध्‍यमातून या समस्‍यांचे निराकरण करण्‍याचा मनसुबा आहे.”

बिझनेस किश्‍त हे उत्‍पादन म्‍हणून वैयक्तिक एमएफआय किंवा आर्थिक संस्‍थेच्‍या गरजांनुसार सानुकूल करता येऊ शकते. हे उत्‍पादन कर्जदार, एफएफआय किंवा कोणत्‍याही आर्थिक संस्थेची भौगोलिक उपस्थितीनुसार, तसेच क्षेत्र संकट/हवामान स्थितीनुसार धोकादायक भागामध्‍ये मोडत असण्‍याच्‍या स्थितीनुसार देखील बदलता येऊ शकते. तसेच एमएफआय किंवा आर्थिक संस्‍थांना कर्ज देणा-यांच्‍या स्थितीनुसार विमा संरक्षणाची गरज असू शकणा-या ईएमआयची संख्‍या निवडण्‍याचा देखील पर्याय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button