राजकारण

नवाब मलिकांविरोधातील सत्य जनतेसमोर आणणार, हाजी अराफत यांचे प्रतिआव्हान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. फडणवीसांनी हाजी अराफतच्या भावाचे प्रकरण दाबले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यावर अल्पसंख्यांक अध्यक्ष हाजी अराफत यांनी प्रत्युत्तर दिलं असून मलिकांची मानसिक स्थिती बरी नसल्याचे म्हटलं आहे. नवाब मलिकांच्या सर्व आरोपांवर प्रत्युत्त देणार असून त्यांना तोंड दाखवण्याची लाज वाटेल असा घणाघात हाजी अराफत यांनी केली आहे.

भाजप नेते आणि अल्पसंख्यांक अध्यक्ष हाजी अराफत यांच्या भावाला बनावट नोट प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाला देवेंद्र फडणवीस यांनी दाबले असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. यावर हाजी अराफत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संपर्क साधताना आरोप फेटाळले आहेत. हाजी अराफत म्हणाले की, नवाब मलिकांचे मानसिक संतुलन ठीक नाही आहे. त्यांच्या घरातील लोकांना विनंती आहे की, त्यांना चांगल्या डॉक्टरांना दाखवण्यात यावे. तसेच मलिकांच्या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया देणार असल्याचे हाजी अराफत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सिनेमा नवाब मलिक यांनी सुरु केला आहे परंतु त्याचा अंत मी करणार, कोणाची मुलगी कोणाला घेऊन पळाली, कोणाचा मुलगा गेला? कोणाचे संबंध अंडरवर्ल्डशी आहे? या सगळ्या गोष्टी पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचा इशारा हाजी अराफत यांनी दिला आहे. तसेच नवाब मलिकांना सांगू इच्छितो की, त्यांना तोंड दाखवण्याची जागा राहणार नाही. आता नवाब मलिकांना मीडियाची सवय झाली आहे. त्यांना सकाळी आणि संध्याकाळी मीडिया पाहिजे परंतु काही दिवसानंतर मीडियापासून पळतील असे हाजी अराफत म्हणाले.

फडणवीसांचा निकटवर्तीय असल्याने मलिकांची जळफळाट

नवाब मलिकांनी फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तींवर आरोप केले असल्याची चर्चा सुरु होती. यावर हाजी अराफत म्हणाले की, मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा निकटवर्तीय आहे. ते आमचे नेते आहेत आशिष शेलार यांचा देखील निकटवर्तीय आहे. मराठा मुस्लिम हाजी अराफत शेख महाराष्ट्रात आला आणि खाटीक समाजाता चांगला प्रभाव असल्यामुळे तसेच मुस्लिम समाज भाजपशी जोडला जात असल्यामुळे यांचा जळफळाट होत आहे, असा घणाघात हाजी अराफत यांनी केला आहे.

नोटबंदीचे प्रकरण झाले त्या वेळी शिवसेनेचा उपनेता होतो. भाजपशी काहीही संबंध नव्हता. भाजपमधील नेत्यांशी माझी दोस्ती होती. त्यावेळी सर्व पक्षांशी संबंध होता. परंतु शिवसेनेचा नेता होतो. याबाबतही पत्रकार परिषद घेणार असून सर्व माहिती देणार असल्याचे हाजी अराफत यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button