मेडिकल वस्तूंवरचा जीएसटी माफ करा; सोनिया गांधींची पंतप्रधान मोदींना विनंती
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी लॉकडाऊनबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात लॉकडाऊनसह आणखी दोन मागण्या केल्या आहेत. लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. पण असे करताना प्रत्येक गरिबांच्या खात्यात सहा हजार जमा करा, योग्य पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या, कोरोना संबंधीत सर्व मेडिकल वस्तूंवरचा जीएसटी माफ करा अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केली आहे.
सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यांना लसीचा पुरवठा करताना त्या त्या राज्यांतील सक्रिय रुग्णसंख्या आणि संभाव्य रुग्णसंख्येचा ग्राफ लक्षात घ्यावा. कोरोनासंबंधित सर्व मेडिकल वस्तूंवरचा जीएसटी माफ करावा. सध्या व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडरसह रेमडेसिवीर आणि इतर औषधांवरही जीएसटी कर घेतला जात होता. योग्य पात्रता असलेल्या सर्व पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या, पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली असून असे करण्याआधी प्रत्येक गरीबाच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करा. तसेच स्थलांतरित मजुर, कामगारांच्या मदतीसाठी देखील सरकारने योग्य ती पाऊले उचलावी असे या पत्रात स्पष्ट केले आहे.
देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातीव सर्व राज्यपालांसह बैठक घेणार आहेत. केंद्रशासित प्रदेशातील उपराज्यपालही या बैठकीत सहभागी होणार आहेत. १४ एप्रिल रोजी ही बैठक पार पडेल. या बैठकीत उपराष्ट्रपतींसह व्यंकय्या नायडू देखील या राज्यपालांसह उपस्थित राहणार आहेत.