ख्रिसमसनिमित्त ग्रोवेल्स १०१ मॉलद्वारे वंचित मुलांसाठी जॉली जंबोरीचे आयोजन
मुंबई : आनंद व आशेच्या उत्साहासह ख्रिसमस साजरा करण्यासाठी कांदिवलीमधील (मुंबई) ग्रोवेल्स १०१ मॉलने एनजीओ ब्राइट किड्स फाऊंउेशनच्या सहयोगासह जवळपास ३० वंचित मुलांसाठी २३ डिसेंबर २०२१ रोजी जॉली जंबोरीचे आयोजन केले. सुरक्षितताविषयक खबरदारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मुले मॉलमधील सजावट पाहून अचंबित झाली. मॉल अॅट्रियम्सच्या उच्च सिलिंग्जवरून मोठे ख्रिसमस ऑर्नामेण्ट्स लटकताना दिसत होते. आगमनादरम्यान मैत्रीपूर्ण स्वागतानंतर मुलांनी धमाल कार्यक्रम, किड्स कार्निवल खेळाच्या भागामध्ये धमाल राइड्स, पार्टी गेम्स व गूडीज आनंद घेत खूप धमाल केली.
यंदा ग्रोवेल्स १०१ मॉलमधील नेत्रदीपक सजावट सांताज व्हिलेज या थीमवर आधारित आहे. सजावटीच्या मध्यभागी विशाल सांताज हाऊस व ख्रिसमस ट्री आहे. ‘सांता’ने मुलांना भेटवस्तू देण्यासाठी स्वत:हून येऊन त्यांची भेट घेतली तेव्हा उत्साहामध्ये अधिक आनंदाची भर झाली. मुलांनी घरामध्ये जाऊन सांता क्लॉजसोबत, तसेच घरामध्ये सजावण्यात आलेल्या भव्य मेणबत्त्यांसोबत फोटो काढले. घरातील स्वप्नवत ‘फेअरी टेल चॅरियोट’ लहान अतिथींसाठी अत्यंत नयनरम्य व उत्सावर्धक आहे. त्यानंतर मुलांना फूड कोर्टवर नेण्यात आले, जेथे त्यांनी रिफ्रेशमेण्ट्सचा आस्वाद घेतला.
ग्रोवेल्स १०१ मॉलचे कार्यसंचालन पाहणारे रिटेल अॅण्ड रीयल इस्टेट, ग्रॉअर अॅण्ड वील (इंडिया) लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) सचिन धनावडे म्हणाले, आम्हाला आनंद होत आहे की, ब्राइट किड्स फाऊंडेशनने आमचे आमंत्रण स्वीकारले आणि आम्हाला या मुलांना काही धमाल क्षणांचा आनंद देण्याची संधी दिली. ब्राइट किड्स फाऊंडेशन या मुलांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यामध्ये लक्षणीय कामगिरी करत आहे, तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्याची देखील काळजी घेत आहे. आम्ही ग्राहकांना आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणा-या ब्राइट किड्स फाऊंडेशन सारख्या संस्थांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करतो.