आरोग्य

‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात जागा देणार : अजित पवार

मुंबई : देशभरात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातही लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणाला खिळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर लसउत्पादक कंपनी ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तिनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा सुरळीत रहावे तसेच सर्व रुग्णांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी नियोजन करण्यात आहे. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठीच लसउत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात जागा देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. भारत बायोटेक कंपनीच्या प्लॅन्टला पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन सुरु आहे. ते कामही तातडीने मार्गी लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button