राजकारण

सरकारमधील ओबीसी मंत्री माकड झालाय; पडळकरांची खरमरीत टीका

मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यात आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर जहरी टीका केली आहे. सरकारमधील ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय, अशी खरमरीत टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. तसंच, फडणवीस यांनी घेतलेली भूमिकेचं देखील कोतुक केलं.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन पडळकर यांनी पुनर्वसन मंत्री आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेत्यांचं काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर झालं असून ओबीसी मंत्र्यांचं माकड झालं आहे, अशी खरमरीत टीका पडळकरांनी केली आहे. जर ओबीसी मंत्र्यांच्या शब्दाला मातीची किंमत नाही आहे तर सर्वसामान्य ओबीसींविषयी या या प्रस्थापितांना किती आकस असेल, असं पडळकर म्हणाले.

जो पर्यंत ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित होणार नाही, तो पर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही, असं ओबीसी मंत्री म्हणतात. पण दुसऱ्याच दिवशी निवडणुका जाहीर होतात. काय किंमत झाली आहे ओबीसी मंत्र्यांची? असा टोला पडळकरांनी लगावला. तुम्ही काय फक्त प्रस्थापितांना मुजरे घालण्यासाठी मंत्री झालात का? तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का? असे प्रश्न पडळकरांनी या मंत्र्यांना केली आहे. आता हे बास झालं. ओबीसी भटके विमुक्त बहुजन समाजाचा विश्वास घात करून निवडणुका घ्याल तर ओबीसी समाज दणका दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा देत ही ओबीसी बहुजनाच्या आक्रोशाची आग महाराष्ट्रभर पेटेल, असं पडळकर म्हणाले. येत्या २६ तारखेला तुम्ही समस्त ओबीसी, भटके, बहुजन, अठरापगड बारा बलुतेदार समाजाची ताकद बघालच. तुमच्या गढ्यांना धक्का द्यायला आम्ही येतोय, असा इशार पडळकरांनी राज्य सरकारला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button