Top Newsस्पोर्ट्स

भालाफेकीत भारताला सुवर्ण; नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी

टोक्यो : भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा याच्या खेळीकडं भारताच्या नजरा लागल्या होत्या. करोडो भारतीयांचं स्वप्न नीरजनं पूर्ण करत टोक्यो ऑलिम्पिकमधील पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. भारतासाठी आणि भारतीय खेळांसाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. भारताने टोक्यो ऑलिम्पिकचा ‘सुवर्ण’ शेवट केला. भारताचे हे ऑलिम्पिक स्पर्धांतील केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. याआधी नेमबाज अभिनव बिंद्राने (२००८) भारताला ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरच्या अंतराची नोंद केली. हे अंतर इतर कोणत्याही भालाफेकपटूला पार करता आले नाही. त्यामुळे नीरजने ऐतिहासिक ‘सुवर्ण’ कामगिरी केली. भारताचे हे ऑलिम्पिक अ‍ॅथलेटिक्समधील १०० वर्षांतील पहिलेच पदक ठरले. तसेच यंदाच्या ऑलिम्पिकमधील हे भारताचे एकूण सातवे पदक ठरले. त्यामुळे भारताने २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांच्या सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले आहे.

पहिल्या राऊंडमध्ये ८७.०३ मीटर लांब भाला फेक करत त्यानं आघाडी मिळवली आहे. नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं, अखेर करोडो भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्रानं पूर्ण केलं आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये नीरज चोप्रानं ८७.५८ मीटर एवढ्याअंतरावर थ्रो फेकला आहे.पहिल्या दोन फेऱ्यांपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं फेकलेल्या थ्रोची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. टोक्यो ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.

भालाफेकीत नीरज चोप्राची धडाकेबाज सुरुवात केली. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मी इतका भालाफेक केला. फायनलमध्ये तो अशीच दमदारी कामगिरी करुन, आज तो पदक मिळवतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्राने ८७.५८ मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. नीरज चोप्रानं तिसऱ्या थ्रोमध्ये ७६.७९ मीटर थ्रो फेकला. तर, नीरज चोप्राचा चौथा थ्रो फाऊल ठरला. नीरजनं टाकलेला पाचवा थ्रो देखील फाऊल ठरला आहे. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.

नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नवह्ती. सुरुवातीच्या काळात नीरज चोप्रा इतरांप्रमाणं क्रिकेट खेळत होता. नीरज चोप्रानं मार्च २०२१ मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस पटियाळा येथे ८८.०७ मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता. २०१८ मध्ये नीरज चोप्रानं आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यावेळी त्यानं ८८.०६ मीटर भाला फेकला होता.

नीरज चोप्राचा जन्म हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील एका शेतकरी कुटुंबात २४ डिसेंबरला जन्म झाला होता. नीरजनं त्याचं शिक्षण चंदीगढ येथे पूर्ण केलं. २०१६ मध्ये पोलंड येथे झालेल्या २० वर्षाखालील आयएएएफ जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. यानंतर नीरज चोप्राची इंडियन आर्मीत ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button