मुंबई : राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, समाजवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आणि शाहीर लीलाधर हेगडे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सांताक्रुजच्या साने गुरुजी शाळेचे ते संस्थापक सदस्य अ अनेक वर्षे अध्यक्ष होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सहभाग होता. मृत्यू पश्चात आपले शरीर दान करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यानुसार परळच्या केईएम रुग्णालयाला तो देण्यात येईल. भारत दर्शन, महाराष्ट्र दर्शन, शुवभक्त दर्शन, आदी नृत्य, संगीताचे भव्य कार्यक्रम त्यांनी केले. सेवा दलाच्या अनेक लोकनाट्यांमध्ये ते असत.