Top Newsराजकारण

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी; उद्धव ठाकरेंकडून चौकशीची मागणी

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंजाब घटनेबाबत एक ट्विट केलं आहे. सुरक्षेतील त्रुटींमुळे देशानं दोन पंतप्रधान गमावले आहेत, म्हणून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये. पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन आता जोरदार राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे. भाजपानं पंजाब काँग्रेसवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काँग्रेसनंही मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन वेगवेगळे आरोप केले आहेत. यातच आता संजय राऊत यांनीही उडी घेतली. पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षे बाबत कोणतीच तडजोड होता कामा नये.पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधींनीही केली चौकशीची मागणी

काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी संपर्क साधला. यात त्यांनी, या संपूर्ण घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत काँग्रेस हायकमांडने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी सीएम चन्नींना, पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात संपूर्ण काळजी घ्यायला हवी, असे सांगितले. तसेच झालेल्या घटनेस जे कुणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button