आरोग्य

गोव्यात आजपासून पाच दिवस कडक लॉकडाऊन

पणजी : गोव्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्या राज्यात आता २९ एप्रिल ते ३ मे असा ५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. गुरुवारी संध्याकाळी ७ पासून ते ३ मे च्या सकाळी ६ वाजेपर्यंत गोव्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहील.

गोवा सरकारने लावलेल्या या लॉकडाऊनमुळे राज्यातील कसिनो, हॉटेल्स आणि पब हे बंद राहणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि उद्योगधंदे सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल, हॉस्पिटल्स, किराणा मालाची दुकाने, दूध, भाजीपाला यांचा समावेश आहे.

जे लोक गोव्यामध्ये येत आहेत त्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे. गोवा हा आंतरराष्ट्रीय टूरिस्ट स्पॅाट आहे. अनेकांनी लॅाकडाऊनमध्ये गोव्यातून कार्यालयीन काम करायला पसंती दिलीय. तसेच महाराष्ट्रात गेल्या १४ एप्रिलला लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मराठी आणि हिंदी मालिकांचे शुटिंग गोव्यामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. आता या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमुळे शुटिंग कसं करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या मालिकांच्या शुटिंगवर मोठ्या प्रमाणात निर्बंध येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button