Top Newsआरोग्य

गडकरींच्या पाठपुराव्याने रेमडेसिव्हीरचे उत्पादन; जेनेटिक लाईफ सायन्सेसमधील प्रयॊग यशस्वी

नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होतेय. अशावेळी रेमडेसिव्हीरचा तुटवडा आणि काळाबाजार होत असल्याचं राज्यात सर्वत्र पाहायला मिळालं. साधारण दीड हजार रुपये किमतीचं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 30 ते 40 हजारांना विकल्याच्या बातम्या आल्या. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीला रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवण्याची परवानगी मिळवून दिली. त्यानंतर आज या कंपनीतून इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर आला आहे.

नितीन गडकरी यांनी जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीतून रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर पडला आहे. एकूण १७ हजार इंजेक्शन्स वापरास सज्ज झाले आहेत. वर्धा इथं उप्तादित झालेले हे इंजेक्शन्स नागपूरसह राज्यभरात वितरीत केले जाणार आहेत. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका व्हर्च्युअल सभेत हे इंजेक्शन्स सुपुर्द करण्यात आले. वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत ५ मे रोजी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात झाली होती.

दरम्यान काही दिवसापूर्वी राज्यातील रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिव्हीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिव्हीरचे उत्पादन करण्यात येत आहे. तसेच जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये 30 हजार इंजेक्शन्स बनवण्याचं लक्ष्य आहे. हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्सला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.

महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते . कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन्स पाठवण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button