उद्धव ठाकरेंच्या नैतिकतेवर फडणवीसांचे प्रश्नचिन्ह
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/03/df-768x405.jpg)
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत केविलवाणी होती. कोणत्याही मुख्यमंत्र्यांची इतकी केविलवाणी अवस्था पाहिली नाही. या प्रकरणातील क्लिप्स खऱ्या की खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी सांगाव्यात, असं आव्हान देतानाच कुणाला साधूसंत ठरवायचे असेल तर जरूर ठरवा, पण तुमच्या नैतिकतेचं काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिभाषण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांची स्थिती केविलवाणी आहे. अशी स्थिती कुणाचीही होऊ नये. काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नैतिक धैर्य त्यांना साथ देत नसल्याचं दिसत होतं. चेहऱ्यावर मास्क असतानाही आणि बोलतानाही त्यांना नैतिक धैर्य साथ देत नसल्याचं दिसून येत होतं, अशी टीका फडणवीस यांनी केली.
यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन सवाल केले. यवतमाळ मेडिकल कॉलेजात जे घडलं ते खरं की खोटं हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. त्या क्लिप्स खऱ्या की खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, असं सांगतानाच तुमची नैतिकता काय आहे? हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, असं आव्हानच फडणवीस यांनी दिलं.
नाईट लाईफवरून टीका
अनेक मंत्री हे स्वताला मुख्यमंत्री समजतात. म्हणून त्यांचेच मंत्री त्यांचे नियम धुडकावतात. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचं वरळीतील लोक ऐकतात. म्हणूनच त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे नाईटलाईफ बिनधास्तपणे सुरू आहे. कोरोना हा फक्त शिवजयंतीसाठी आहे, नाईटलाईफसाठी नाही. अधिवेशनाच्या वेळी कोरोना असतो नाईट लाईफला नसतो, अशा शब्दांत त्यांनी नाईट लाईफवरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं.
डेलकर प्रकरणाची चौकशी व्हावी
यावेळी त्यांनी खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली. ज्या ठिकाणी सुसाईड नोट सापडते किंवा घटना घडते तिथेच तपास झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी डेलकर प्रकरणाचा जरूर तपास करावा. यात एकाही भाजप नेत्याचा हात नाही. किंबहूना यात भाजप नेत्याचा हात नसल्यानेच ते कुणाचंही नाव सांगत नाहीत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
काँग्रेसचा सायकल मोर्चा हा मीडिया इवेंट
राज्यात काँग्रेसची अवस्था वाईट आहे, काँग्रेसचा सायकल मोर्चा हा मीडिया इवेंट, 27 रुपये पेट्रोल आणि डिझेलवर त्याठिकाणी लावलेला आहे, खरंच बघितलाच केंद्र सरकारचा एकूण 33 रुपये त्याच्यामध्ये चार रुपये हे कृषी चार रुपये कमिशन आहे, उर्वरित हे पैशात त्यातले 42 टक्के पैसे केंद्र सरकारकडे येतात येथे राज्याला परत करताना राज्य सरकारने मात्र 27 रुपये पेट्रोलवर लावलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की नाना पटोले पश्चाताप समृद्ध असावं किंवा 27 रुपयाचा टॅक्स कमीत कमी करावा आणि दुसरा क्रमांक किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान दहा रुपये हे पेट्रोल डिझेल स्वस्त करावं आंदोलन असावा तेव्हा दुसरी शंका अशी आहे हुशार आहे. नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. काँग्रेसला विरोधी पक्षांची जागा घेता येणार नाही. देशात काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे, अशा अवस्थेत मीडिया इवेंट ते करत आहेत. वीज बिलाचा मुद्दा महत्वाचा आहे. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राज्यात यापूर्वी कधी झाली नाही.