फेसबुकचे ‘हे’ फीचर बंद होणार, तर व्हॉट्सअॅप युजर्ससाठी ३ नवे फीचर्स
नवी दिल्ली: मार्क झुकरबर्गने त्यांच्या फेसबुक कंपनीचे नाव काही दिवसांपूर्वीच ‘मेटा’ केले आहे. त्यानंतर आता फेसबुकने आपल्या फेसबुक अॅपमध्ये एक मोठा बदल केला आहे. फेसबुकने केलेल्या बदलानुसार, आता यापुढे तुम्ही फोटो अपलोड केल्यावर दुसऱ्याला ऑटो टॅग होणार करणार नाही. गोपनीयतेवरुन फेसबुकवर झालेल्या आरोपांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
या मोठ्या बदलाची अधिकृतरित्या घोषणा फेसबुककडून करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून फेसबुकवर स्वतःच्या फायद्यासाठी युजरच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप लागत आहेत. त्यानंतर आता कंपनीने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. फेसबुकने म्हटले की, कंपनी आता चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान बंद करेल. तसेच, फेसबुकच्या सर्वरमध्ये असलेल्या एक अब्जाहून अधिक लोकांच्या प्रिंट डिलीट करणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला ऑटो टॅग ऑप्शन मिळणार नाही.
काय आहे ऑटो टॅग ?
तुम्ही अनेकदा फेसबुकवर स्वतःचा किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत काढलेला फोटो अपलोड केला असेल. तेव्हा फेसबुक त्या फोटोतील तुम्हाला आणि व्यक्तीला तुमच्यासोबत टॅग करत होते. फेसबुक हे सर्व आपल्या फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीच्या मदतीने करत असे. खरं तर, फेसबुक आपल्या वापरकर्त्यांचे चेहरे त्यांच्या सर्व्हरवर सेव्ह करुन त्याचा वापर करत असे. हे सर्व फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जायचे. यावरुन फेसबुकवर युजरची माहिती चोरल्याचा आरोप लागला होता. यामुळे कंपनीला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला आहे. पण, आता येत्या आठवडाभरात हे तंत्रज्ञान बंद करण्याची फेसबुकने घोषणा केली आहे.
सर्व्हरवरुन डेटा डिलीट करणार
हे तंत्रज्ञान बंद करण्यासोबतच फेसबुक आपल्या सर्व्हरवर असलेला शेकडो कोटी चेहऱ्यांचा डेटा काढून टाकणार आहे. फेसबुकचे हे तंत्रज्ञान गोपनीयतेच्या मुद्द्यामुळे बऱ्याच काळापासून वादात होते. या तंत्रज्ञानामुळे फेडरल ट्रेड कमिशनने २०१९ मध्ये फेसबुकला ५०० मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला होता. तसेच, फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीमुळे गेल्या वर्षी अमेरिकेतील इलिनॉय राज्यात, फेसबुकने त्यांच्याविरुद्धच्या खटल्यात ‘फेस जिओमेट्री’सह तक्रारकर्त्यांना बायोमेट्रिक माहितीच्या वापरावर तोडगा काढण्यासाठी ६५० दशलक्ष डॉलर्स दिले होते.
यामुळे कंपनीचे नावही बदलले
फेसबुकच्या या तंत्रज्ञानाला विरोध करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि बायोमेट्रिक माहिती फेसबुककडे असणे हे होते. मात्र, गेल्या महिन्यात फेसबुकचे माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेनने फेसबुकचे अंतर्गत दस्तावेज लीक केले होते, त्यानंतर फेसबुककडून मोठा विरोध झाला होता. कंपनी वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचा आरोप करण्यात आला. ही चूक सुधारण्यासाठी त्याने आपल्या कंपनीचे नावही बदलले होते.
दिवाळीआधी व्हॉट्सअॅपकडून मोठी भेट !
फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅप ने आपल्या युजर्ससाठी तीन नवीन फीचर्स लाँच केले आहेत. युजर्सला कमालीचा चॅटिंग एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनी आपल्या अॅपमध्ये नेहमीच नवीन नवीन अपडेट आणत असते. इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तीन नवीन दमदार फीचर्स आणले आहे. ज्यामधील दोन व्हॉट्सअॅप अॅप आणि एक व्हॉट्सअॅप वेबसाठी आहे. व्हॉट्सअॅपने दिवाळीआधी युजर्सना ही मोठी भेट दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊया…
व्हॉट्सअॅप ने या फीचरच्या रुपाने डेस्कटॉप फोटो एडिटरला आणले आहे. जे एक आवश्यक फीचर्स आहे. हे फीचर्स युजर्सला डेस्कटॉप अॅपच्या मदतीने फोटो सेंड करण्याआधी एडिट करण्याचा ऑप्शन देतो. याआधी हे काम पेंट किंवा अन्य एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने करावे लागत होते. व्हॉट्सअॅपच्या या फीचर्सच्या मदतीने युजर्स स्टिकरला सुद्धा अॅड करू शकता. आतापर्यंत हे फीचर्स फक्त फोनवर उपलब्ध होते.
कोणीही ऑनलाईन लिंक पाठवून कोणासोबतही चर्चा सुरू करू शकतो. लोक आपल्या मित्रांसोबत ते ऑनलाइन काय करीत आहेत. काय पाहतात, आणि काय ऐकत आहेत याबाबत बोलण्यास नेहमीच उत्सुक असतात. व्हॉट्सअॅपने आपल्या चॅटिंगच्या दरम्यान, लिंक प्रीव्ह्यूच्या ऑप्शनला बदलले आहे. युजर्स आता पूर्ण लिंक प्रीव्ह्यू पाहू शकतात.
व्हॉट्सअॅप चॅट दरम्यान स्टिकरचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला सामान्य रूपाने योग्य स्टिकर शोधण्यासाठी अनेक टॅबमधून जावे लागते. कधी कधी हे स्टिकर मिळत नाहीत. ज्याला तुम्ही शोधत आहात. आता हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअॅप युजर्सला चॅटिंग दरम्यान, आता स्टिकरचे सजेशन मिळेल. यावरून तुम्हाला एकदम योग्य स्टिकर वापर करण्यास मदत मिळेल. हे युजर्सच्या चॅटिंगच्या फ्लोवर परिणाम करू शकत नाहीत. आता नवीन फीचर्स आणल्यानंतर युजर्सला कोणताही त्रास होणार नाही. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी हे फीचर प्रायव्हसीला डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आले आहे. त्यांच्या पर्सनल मेसेज एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनकडून सुरक्षित राहते.