Top Newsराजकारण

भाजपमध्ये मोदी-शाह वगळता इतरांनी उगाच फडफड करू नये ! शिवसेनेची बोचरी टीका

मुंबई : काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेकडून जोरदार समाचार घेण्यात आला आहे. भाजप एखाद्या कुटुंबाच्या हातात नाही असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. कुटुंबकेंद्रित असणं व व्यक्तिकेंद्रित असणं यात फार फरक नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत, अशी टीका शिवसेनेकडून ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मोदी-शाह यांच्याव्यतिरिक्त आज भाजपमध्ये अन्य कुणाचे बोलणे ऐकले जातं का? राष्ट्रीय कार्यकारिणी वगैरे हा सर्व मुखवटा आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय भाजपकडे निवडणूक जिंकून देणारा चेहराच नाही. त्यामुळे इतर मोहोऱ्यांनी उगीच फडफड करू नये. सात वर्षांत जनतेचा विश्वास खरोखरच जिंकला असता तर फक्त ‘मोदी मोदी’ करण्याची वेळ पक्षावर आली नसती, अशा शब्दांत या अग्रलेखातून भाजपचा समाचार घेण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाची उभारणी व जडणघडण करण्यात आडवाणी यांनी आयुष्य वेचले आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांनी जनतेचा विश्वास सरळ मार्गाने जिंकला होता. कुटुंबाची सत्ता हा वेगळा भाग, पण व्यक्तिकेंद्रित सत्तेचा पट दोन-चार लोकांच्याच हाती असतो व ते त्याचेच कुटुंब असते. त्या कुटुंबापलीकडे सत्तेचा परिघ सरकत नाही. गांधी घराणे आहेच, पण आज कोणती घराणी सत्ता चालवीत आहेत हे काय देशाला माहीत नाही?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या जडणघडणीत ज्यांनी हयात घालवली अशा सगळय़ाच ज्येष्ठश्रेष्ठांना आज ‘मार्गदर्शक मंडळा’च्या कोंदणात ‘मानाचे स्थान’ दिले असले तरी हा व्यक्तिकेंद्रित आणि ‘उदो उदो’ राजकीय व्यवस्थेचाच भाग आहे. भारतीय जनता पक्षाची उभारणी व जडणघडण करण्यात आडवाणी यांनी आयुष्य वेचले आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांनी जनतेचा विश्वास सरळ मार्गाने जिंकला होता. कुटुंबाची सत्ता हा वेगळा भाग, पण व्यक्तिकेंद्रित सत्तेचा पट दोन-चार लोकांच्याच हाती असतो व ते त्याचेच कुटुंब असते. त्या कुटुंबापलीकडे सत्तेचा परिघ सरकत नाही. गांधी घराणे आहेच, पण आज कोणती घराणी सत्ता चालवीत आहेत हे काय देशाला माहीत नाही?, असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.

एनसीबीच्या सुपारीबाज अधिकाऱ्यांच्या टोळीशी ‘जॉइण्ट व्हेंचर्स’ करून ड्रग्जसंदर्भातले खेटे गुन्हे दाखल करायचे. श्रीमंतांच्या पोरांना याबाबत अडकवायचे व खंडण्या उकळायच्या, असा नवा कारभार भाजपपुरस्पृत लोकांच्या सहकार्याने सुरू झाला आहे. त्यासाठी श्रीमंतांच्या मुलांचे अपहरण करण्यापर्यंत मजल गेली. राजकरणात पैसे कमावण्याचा हा नवा उद्योग सुरू झाला आहे व भाजपचे भागभांडवल या उद्योगात मोठय़ा प्रमाणात गुंतले आहे. हे असे पितळ उघडे पडत असताना एखादा पक्ष जनतेचा विश्वास कसा जिंकेल? जे धोतरात कमावले ते लुगडय़ात गमावले, असा काहीसा प्रकार घडत आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button