स्पोर्ट्स
आयपीएल २०२२ मध्ये लखनौ आणि अहमदाबाद संघाची एन्ट्री
दुबई : नुकताच भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार संपला असून आता आयपीएलशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. आगामी आयपीएल २०२२ मध्ये ८ नव्हे तर १० संघ खेळणार असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झाली आहे. या दोन संघासाठी अनेक दिग्गज व्यवसायिक आणि बड्या हस्तींमध्ये बोली लावण्यात आल्या आहेत. यापैकी अदानी ग्रुप, आरपीएसजी, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, मँचेस्टर युनायटेड, रणवीर सिंग आणि अरुबिदों अशा काहींनी सर्वात महागड्या बोली लावल्या आहेत.
त्यानंतर आता आरपीएसजी अर्थात आरपी संजीव गोयंका ग्रुपस आणि सीवीसी कॅपिटल कंपनीने लिलाव जिंकला आहे. गोयंका ग्रुपने अहमदाबाद संघ ७ हजार ९० कोटी रुपये, तर सीवीसी कॅपिटल कंपनीने लखनौ संघ ५ हजार १६६ कोटींना लिलावात विकत घेतला आहे.