राजकारण

‘ईडी’च्या समन्सनंतर खडसे यांची प्रकृती बिघडली; आजची पत्रकार परिषद रद्द

मुंबई: भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मंगळवारी रात्री ईडीने अटक केली. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सक्तवसुली संचलनालयानं एकनाथ खडसें यांना समन्स बजावलं आहे. त्यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली.

गिरीश चौधरी यांना ईडीनं मंगळवारी रात्री अटक केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यादेखील अडचणी वाढतील की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होतं. झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे खडसे यांनी सांगितलं होतं. मात्र, पदाचा गैरवापर करून खडसे यांनी या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एमआयडीसीची होती असं नंतर समोर आलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button